@कुंभवडे गावात दुर्मिळ ब्लॅक पँथर
Black Panther Spotted in Dodamarg
दोडामार्ग हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले छोटे शहर
सह्याद्री पर्वतरांगात ब्लॅक पँथर
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घनदाट जंगलामध्ये वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावात दुर्मिळ ब्लॅक पँथरचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. आठ महिन्यांपूर्वी तेरवण-मेढे परिसरातही ब्लॅक पँथर पहावयास मिळाला होता. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगात ब्लॅक पँथरचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे.
कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडे मधील जंगल भागात हा दुर्मिळ ब्लॅक पँथर पहावयास मिळाला. वाहन आल्याचे पाहताच ब्लॅक पँथर झुडपांमध्ये लपू लागला. यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पँथरची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.
मार्च महिन्यातही तेरवण मेढे येथील जंगलात वाइल्ड वन या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ब्लॅक पँथर दृष्टीस पडल्याची घटना घडली होती. सह्याद्रीच्या पर्वतरांगात पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याने येथील जैवविविधता अधोरेखित होते. वनविभागाने देखील या परिसरात ब्लॅक पँथर असल्याचे सांगितले.
#BlackPanther #Kumbhavade #Dodamarg #Sahyadri #Maharashtra #Sindhudurg #Wildlife #Biodiversity #RareSightings #NaturePhotography #WildlifeConservation #ForestLife #Panther #NatureLovers #AnimalSightings #EcoTourism #WildlifeProtection #SahyadriMountains #JungleAdventure #NatureExploration