बेळगाव : महालक्ष्मी यात्रेपूर्वी @नंदगड छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती

0

 


बेळगाव : महालक्ष्मी यात्रेपूर्वी @नंदगड छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती 








  • दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी महालक्ष्मी यात्रेला सुरुवात होणार 
  • 24 वर्षानंतर यात्रा होत असल्याने नंदगड गावात उत्साहाचे वातावरण 
  • संगोळी रायण्णा यांची कर्मभूमी तथा समाधी स्थळ असलेल्या नंदगड गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी यात्रा



नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षता रोपणानंतर देवीचे गावभर भ्रमण होऊन पाचव्या दिवशी ती गदगेवर स्थानापन्न होणार. चार दिवस ती गावात ठीकठिकाणी वस्तीला राहणार 





बेळगाव-belgavkar : खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य नसल्याची उणीव भासत होती. याची दखल घेऊन आजी-माजी सैनिकांनी नंदगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. याला नंदगड येथील सर्वांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 


फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या महालक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती बसवण्याचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत पंचधातूची सिंहासनावर बसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मूर्ती जुन्या नंदगड येथील राजा शिवछत्रपती चौकात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उपस्थितांनी ही मूर्ती बसवण्यासाठी देणग्याही जाहीर केल्या आहेत. 


आजी-माजी सैनिकांच्या पुढाकारातून  ही मूर्ती बसवण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव येथील मूर्तिकार विक्रम पाटील यांना मूर्ती करण्याचे काम देण्याचे ठरवण्यात आले असून त्यांना भेटून रक्कम ठरवण्यात आली आहे. काही रक्कमही देण्यात आली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक समाजसेवक गुंडू रामा हलशीकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीस्थळ कमिटीचे अध्यक्ष सागर खेमानी पाटील, राजू पाटील, भरमाणी सांगोळकर, श्री लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव आदी उपस्थित होते.



#Belgaum #Nandgad #ChhatrapatiShivajiMaharaj #StatueUnveiling #MahalakshmiYatra #HistoricalSite #VeteransInitiative #CommunitySupport #ArtisanVikramPatil #CulturalHeritage #ShivajiMaharaj #LocalArtists #PublicDonation #SculptureInstallation #BelgaumHistory #ShivajiStatue #CivicEngagement #HeritagePreservation #CulturalCelebration #BelgaumPride


छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले आणि आई जिजाबाई यांचा संस्कार त्यांच्या जीवनावर फार मोठा होता.

शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यांनी "गनिमी कावा" या युद्धनीतीचा वापर करून मुघल आणि आदिलशाहीसारख्या मोठ्या साम्राज्यांविरुद्ध यश मिळवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी मजबूत किल्ल्यांची निर्मिती, आरमाराची उभारणी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठेवला.

शिवाजी महाराजांना 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून छत्रपती पदावर विराजमान करण्यात आले. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार करताना लोककल्याणकारी धोरणे अवलंबली.

त्यांच्या पराक्रमामुळे आणि नेतृत्त्वामुळे ते भारतीय जनतेसाठी प्रेरणास्थान ठरले. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला, पण त्यांची आठवण आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रम, न्याय आणि प्रशासनाचे प्रतिक मानले जातात.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)