दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा अन् ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस

0


दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा अन् ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस






Cyclone Fengal strikes coastal Tamil Nadu, Puducherry


Cyclone Fengal reaches coast, makes landfall near Puducherry


फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री उशिरा पुडुचेरीनजिक धडकले. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील उत्तर भागात व पुडुचेरी येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे त्या भागातील रस्ते तसेच हवाईमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. चेन्नईत विमान वाहतूक रविवार स्थगित केली आहे. या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ नये म्हणून किनारपट्टीवरील काही हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.




किनारपट्टी भागात फेंगल वादळ धडकले तरीही यात मोठे नुकसान झाले नाही. कारण वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. 







पश्चिम आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून जम्मू-काश्मीरमध्ये उंच भागांत पुन्हा बर्फवृष्टी झाली आहे. विशेषत: मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये थंडी वाढत आहे. आगामी दिवसांत थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली असून शुक्रवारी ९.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली.


मध्य प्रदेशात रात्रीचे तापमान प्रचंड उतरले आहे. 24 तासांत सर्वात कमी ६.८ अंश तापमान मंडला येथे नोंदले गेले. हे तापमान थंड हवेचे ठिकाण असलेल्या मनालीपेक्षाही कमी होते. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीत वाढ झाली असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवस थंडीचा हा प्रकोप राहू शकतो.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार काश्मीर खोऱ्यात २ डिसेंबरपासून दोन दिवस हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. संपूर्ण काश्मीरमध्ये ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली होता.


#CycloneFengal #TamilNadu #Puducherry #WeatherAlert #HeavyRain #StormImpact #SafetyFirst #DisasterManagement #TravelDisruptions #ColdWave #NorthIndia #JammuKashmir #Snowfall #WeatherForecast #EmergencyResponse #CoastalSafety #PublicSafety #ClimateChange #NaturalDisasters #IndiaWeather

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)