'हायब्रिड मॉडेल' 'कबुल' हैं... #ChampionsTrophy #HybridModel
ICC's ultimatum to PCB: Accept 'Hybrid Model' or
- PCB backs down on Champions Trophy, willing to accept hybrid model but there's a catch
- BCCI Declines to Travel to Pakistan for Champions Trophy 2025
- Partnership or Fusion Formula Has Emerged
Pakistan agrees to hybrid model for Champions Trophy, wants same for ICC events hosted by India in future : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील कळीच्या मुद्द्यावर आता तोडगा निघालाय, अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 'हायब्रिड मॉडेल' प्रस्ताव 'कबुल' केलाय. मात्र हायब्रिड मॉडेलसाठी राजी होताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दोन महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.
भारतीय संघ काही केल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येत नसल्याचे पाहून अखेर पीसीबीने नरमाईची भूमिका घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय संघाने PCB समोर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता. पण, त्यांनी तो नाकारला आणि प्रकरण ताणले गेले. काही झाले तरी भारताला पाकिस्तानात खेळावं लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण, भारताशिवाय ही स्पर्धा होणे, अवघड आहे, हे त्यांना मनोमन माहित होते. तरीही प्रयत्न करून बघूया, म्हणून ते ‘तांडव’सुरू केला होता.
पण, अखेरीस त्यांना कळून चुकले अन् त्यांनी हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव स्वीकारला. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला नाही, तर अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवण्यात यावा. भारताय होणाऱ्या आयसीसी स्पर्धाही हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात याव्या, तरच पाकिस्तान सहभाग घेईल. या दोन अटी PCB ने ठेवल्या आहेत.
'हायब्रिड मॉडेल'च्या प्रस्तावानुसार, भारतीय संघाचे सर्व सामने आणि सेमी फायनल आणि फायनल लढत ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानला मान्य आहे. पण जर भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी किंवा फायनलपर्यंत पोहचला नाही तर फायनल लढत ही लाहोरमध्ये घेण्याची अट ठेवल्याचे समजते.
याशिवाय आयसीसीने यापुढे २०३१ पर्यंत हाच फॉर्म्युला कायम ठेवावा, अशीही अट घातली आहे. याचा अर्थ भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेतही हायब्रिड मॉडेलच्या अंतर्गत पाकिस्तानचे सामने भारताबाहेर खेळवण्याची तयारी आयसीसीने दाखवावी, अशी अट घातल्याचे दिसते.
The Pakistan Cricket Board (PCB) has softened its stance on the 'hybrid model' for the upcoming Champions Trophy 2025, set to be played next year. As per the latest reports, the PCB has informed the ICC that it is willing to accept the model but only if the same arrangement is allowed for future events.
Pakistan has not hosted an ICC event since 1996, when they last co-hosted the ODI World Cup. India didn't play a cricket match in Pakistan due to political tensions following the Mumbai terror attack. The last bilateral series between the two nations took place in 2012-13 when Pakistan toured India.
#ChampionsTrophy #HybridModel #PCB #BCCI #CricketNews #PakistanCricket #ICC #Cricket #SportsUpdates #CricketFans #IndiaVsPakistan #CricketCommunity #InternationalCricket #CricketMatch #SportsNews #CricketLovers #CricketLife #CricketHighlights #CricketWorld #Cricket2025