2025 Shani Gochar | Saturn Transit
(2025) नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काउंटडाउन सुरु झालं आहे. नव्या वर्षात ग्रहांची उलथापालथ होणार आहे. त्याकडे ज्योतिषांसोबत ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवण्याऱ्यांचं लक्ष लागून आहे. ग्रहांच्या या उलथापालथीचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम दिसून येणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहेत. मार्च महिन्यात शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
एक अद्भुत योग जुळून आला आहे. जवळपास 100 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्य ग्रहण असा योग आहे. कारण शनिदेव गोचर करणार (राशि परिवर्तन), त्याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. हा शतकांमध्ये एकदा जुळून येणारा दुर्लभ योग आहे.
2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी लागेल आणि हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. याचा अर्थ असा की सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे झाकला जाईल. हे ग्रहण जगभरात अनेक ठिकाणाहून दिसेल ज्यात युरोपचा काही भाग, उत्तर आणि पश्चिम आफ्रिका, बहुतांश उत्तर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अटलांटिक महासागर आणि आर्टिक परिसरात देखील हे सूर्यग्रहण दिसेल.
बर्मुडा, पोर्तुगाल, कॅनडा, यूएसए, मोरोक्को, स्पेन, ग्रीनलँड, आयर्लंड, फ्रांस, युनायटेड किंगडम, आइसलँड, बेल्जीयम, नेदरलँड, फरो आयलंड, जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे. स्वीडन, फिनलंड आणि रशिया मध्ये ही खगोलीय घटना वेगवेगळ्या प्रकारे दिसेल. भारतातून मात्र हे खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही.
2025 मध्ये शनिदेव कुंभ राशी सोडून 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करतील. शनिदेव 3 जून 2027 पर्यंत मीन राशीत राहील.
शनिदेवाच्या राशी बदलाशी संबंधित काही खास गोष्टी :
शनिदेवाच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांना साडेसतीपासून आराम मिळेल.
कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावापासून मुक्ती मिळेल.
शनिदेवाच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
कर्क राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असतात, परंतु शनि मीन राशीत प्रवेश केल्यावर हा प्रभाव संपेल.
मीन राशीच्या लोकांना शनिदेवाच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो.
कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या संक्रांतीचे शुभ परिणाम मिळू शकतात.
शनिदेवाच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांना काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहितीबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
#ShaniGochar2025 #SaturnTransit #Astrology #ZodiacSigns #SolarEclipse #AstrologicalEvents #Horoscope #AstrologyCommunity #SaturnInPisces #AstrologyLovers #CosmicChanges #AstrologyPredictions #PlanetaryMovements #AstrologyInsights #EclipseSeason #SpiritualAwakening #AstrologyLife #ZodiacPredictions #AstrologyForAll #SaturnEffects