बेळगाव : कोण म्हणतयं दगडाला किंमत नाही..? दगडांची किमत वाढणार

0

 


बेळगाव : कोण म्हणतयं दगडाला किंमत नाही..? दगडांची किमत वाढणार







Karnataka cabinet approves proposal to hike construction stone mining royalty


construction stone mining royalty

mining royalty per ton Rs 80

दगडांवरील रॉयल्टी वाढली


बेळगाव—belgavkar—belgaum @कर्नाटक : घर, इमारती बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांची किमत वाढणार आहे. कारण सध्या 70 रुपये प्रति टन रॉयल्टी ठरलेली होती. त्यात आता 10 टक्के वाढ होऊन तो दर सुमारे 80 रुपये प्रति टन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.





बंगळूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, खाणकामातून निर्माण होणाऱ्या दगडांवरील रॉयल्टी वाढविण्यावर सर्वांनी सहमती दिलीआहे. पत्रकारांशी बोलताना कायदा मंत्री एच. पाटील म्हणाले, प्रामुख्याने अवैध उत्खननाला आळा घालण्याबाबत चर्चा झाली. त्यासोबतच बेकायदा उत्खननावर रॉयल्टीसाठी आकारलेला दंड सहा वर्षांपासून प्रलंबित असून वसुली करण्याबाबतही चर्चा झाली आहे. थकित दंड वसुलीसाठी एकरकमी प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



सिद्धरामय्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २० मुद्दे चर्चेसाठी आले. त्यामध्ये खाणकामातून निर्माण होणाऱ्या मायनिंग स्टोनवर रॉयल्टी वाढवण्याचा प्रस्ताव होता. २०२२ मध्ये बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्या. त्यानंतर गतवर्षीही दरात वाढ करण्यात आली होती. यंदा दगडाच्या किमतीत वाढ होणार आहे. 



रॉयल्टीमध्ये किती वाढ? : पूर्वी 20 प्रति टन दगडसाठी रॉयल्टी आकारण्यात आली जात होती. मात्र, नंतर ती अचानक 70 रुपये करण्यात आली. लवकरच रॉयल्टी 10 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक टनावरील रॉयल्टी 80 रुपये असेल. रॉयल्टीतून ३११ कोटी जमा होत होते.


royalty to be paid for mining stone and minor minerals has increased from ₹70 to ₹80 per tonne


मंत्रीएच. के. पाटील म्हणाले की, रस्त्यांच्या विकासासाठी ६९४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अनुदान जारी करण्यात आले आहे. ६९४ कोटी रु. अनुदानातून बीबीएमपी अंतर्गत १६८१ किमीचे उपमुख्य रस्ते विकसित केले जाणार आहेत.



#Belgaum #Karnataka #MiningRoyalty #ConstructionStone #StonePriceIncrease #RoyaltyHike #BuildingMaterials #IllegalMining #Siddaramaiah #CabinetMeeting #MiningIndustry #StoneMining #InfrastructureDevelopment #RoadConstruction #MineralRoyalties #EconomicGrowth #ConstructionCosts #GovernmentPolicy #LocalEconomy #StoneValue

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)