बेळगाव : #BIMS #छापा

0

 


बेळगाव : #BIMS #छापा

Belagavi Institute of Medical Sciences (BIMS Belgaum)





  • औषध गोदामावर अचानक छापा
  • आएल सलाईन (आयव्ही)
  • आरएल सलाईनवर बंदी
  • बिम्स रुग्णालयात 5 बाळंतिणींचा मृत्यू


No more use of IV Ringer’s lactate in government hospitals across Karnataka


बेळगाव—belgavkar—belgaum : बळळारी येथील बिम्स रुग्णालयात 5 बाळंतिणींचा निकृष्ट औषधांमुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त आणि औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयातील औषधाच्या गोदामावर छापा टाकून औषधांची तपासणी केली. उपलब्ध औषध साठ्यातील नमुने त्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. औषध गोदामावर अचानक छापा टाकून औषधांची तपासणी करण्यात आल्याने बिम्स प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.





बळ्ळारी येथील बिम्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 5 बाळंतिनींचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांच्या चौकशी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. बाळंतिणींच्या मृत्यूस एका औषध कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या आएल सलाईन (आयव्ही) कारणीभूत असल्याचा अहवाल चौकशी पथकाने सादर केला आहे. त्यामुळे आरएल सलाईनवर बंदी घालून त्याचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश सर्व शासकीय रुग्णालयांना बजावण्यात आला आहे.


त्यामुळे बेळगाव जिल्हा रुग्णालयात आरएल सलाईनचा वापर केला जात आहे का, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश लोकायुक्त जिल्हा पोलिस प्रमुख हनुमंतरॉय यांना बजावण्यात आला होता. त्यांच्या सूचनेनुसार लोकायुक्त पोलिस उपअक्षीक्षक बी. एस. पाटील, पोलिस निरीक्षक निरंजन पाटील व औषध नियत्रंण अधिकाऱ्यांनी (एडीसी) जिल्हा रुग्णालयातील औषध गोदामावर छापा टाकून तपासणी केली.


यावेळी त्याठिकाणी आरएल सलाईनचा साठा आढळून आला. मात्र, सरकारचा आदेश आल्यापासून त्याचा उपयोग केला जात नसल्याचे बिम्सच्या अधिकाऱ्यांनी लोकायुक्त अधिकारी आणि औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, गोदामातील उपलब्ध औषधांचे नमुने घेऊन त्यांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. अचानक छापा टाकून करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमुळे बिम्स रुग्णालयात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.





आयव्ही फ्लुड्स नमुने जप्त : जिल्हा रुग्णालयातील औषधाच्या गोदामातून औषध नियत्रंण अधिकारी रघुराम आणि मल्लिकार्जुन यांच्या उपस्थितीत आयव्ही फ्लुड्स नमुने जप्त करण्यात आले. त्यांची गुणवत्ता तपाणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांकडून औषधांची तपासणी केली जात होती.




बळ्ळारी येथील बिम्स रुग्णालयात निकृष्ठ औषधामुळे बाळर्तिींचा मृत्यू झाल्याने बेळगाव जिल्हा रुग्णालयातील औषध साठ्याची लोकायुक्त आणि औषध नियंत्रण अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. उपलब्ध औषध साठ्यातील नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेला पाठविण्यात आले.

-बी. एस. पाटील, लोकायुक्त पोलिस उपअधीक्षक.



राज्य सरकारने बळ्ळारी जिल्ह्यातील एका बाळंतिणीच्या मृत्यूचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आयव्ही रिंगर लॅक्टेट सोल्यूशन (आयव्ही आरएलएस) ग्लुकोजच्या वापरावर बंदी घातली आहे, असे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी शनिवारी सांगितले. 



पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले, 'IntraVenous (IV) Ringer's

Lactate Solution (IV RLS) चा वापर बाळंतिणीच्या मृत्यूचे कारण आहे की नाही, हे अधिकृतपणे माहीत नाही. मात्र, संशय आल्याने नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 'आयआरएलएस' ग्लुकोजचा वापर पूर्वीपासून रुग्णालयांमध्ये केला जात आहे. यावेळीही औषध पुरवठा महामंडळाला १९२ बॅचचा पुरवठा करण्यात आला. जेव्हा त्याच्या वापरादरम्यान दोन बॅचेसबद्दल काही शंका उपस्थित केल्या गेल्या. तेव्हा खबरदारी म्हणून सर्व १९२ बॅचेस पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये वापरण्यापासून रोखण्यात आल्या.



In the wake of the deaths of five postpartum women at the District Hospital and Ballari Medical College and Research Centre (BMRC), the state health department has suspended the use of IV Ringer’s lactate in all government hospitals across the state as a precautionary measure, Health Minister Dinesh Gundu Rao announced on Saturday.


The glucose that was administered after caesarean was fake. Ringer Lactate glucose was supplied by Paschim Banga Pharmaceutical Ltd. This glucose has been banned. It was said by the department not to give it. Even then it was used and women lost their lives.



Lactated Ringer's solution, or LR, is an intravenous (IV) fluid you may receive if you're dehydrated, having surgery, or receiving IV medications.


#Belgaum #BIMS #IVFluids #HealthCrisis #MedicalInspection #DrugQuality #PatientSafety #GovernmentHospitals #KarnatakaHealth #MaternalHealth #DrugRegulation #HealthcareInvestigation #MedicalEmergency #QualityControl #DrugWarehouse #HealthAuthorities #PublicHealth #MaternalMortality #DrugBans #HealthAwareness



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)