बेळगाव : पहिल्यांदाच राकसकोप जलाशयात टेम्पो बुडालेला... #Belgaum #RakskopReservoir

1 minute read
0


 

बेळगाव : पहिल्यांदाच राकसकोप जलाशयात टेम्पो बुडालेला... #Belgaum #RakskopReservoir






बेळगाव—belgavkar—belgaum : बुधवारी दुपारी राकसकोप जलाशयातील पाण्यात धुण्यासाठी नेण्यात आलेला छोटा मालवाहतूक टेम्पो न्यूट्रल झाल्याने पाण्यात बुडण्याची घटना घडली होती (Rakskop Reservoir). गुरुवारी सकाळपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बुडालेल्या टेम्पोची शोधमोहीम करण्यात आली. मात्र अंधारामुळे ही मोहीम थांबविण्यात आली होती. आज शुक्रवारी दुपारी टेम्पो पाण्याबाहेर काढण्यात आला.




बेळगाव येथील एचईआरएफ रेस्क्यू टीमने टेम्पो बुडालेल्या ठिकाणापासून शोधमोहीम हाती घेतली. काठापासून २५० फूट अंतरावर चाळीस फूट खोलीवर कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाहनाचा शोध लावण्यात गुरुवारी दुपारी ३ वाजता यश आले. वाहनाला हूक टाकून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी दोरी ओढण्यात आली. मात्र पहिल्याच दणक्यात हूक निसटल्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात अपयश आले. 





त्यानंतर पुन्हा ४ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू झाली. सव्वासहा वाजता वाहन कॅमेऱ्यात दिसून आले. पुन्हा हूक टाकून दोरी काठाशेजारील झाडाला बांधण्यात आली आहे. 10 तासांच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी दुपारी वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले. एचईआरएफचे प्रमुख बसवराज हिरेमठ व त्यांचे सहकारी हाजगोळी येथील दशरथ पाटील, सोनोली येथील दर्शन झंगरुचे यांनी पाण्यात वाहन शोधण्याचे कार्य केले.




वाहन जलाशयात बुडण्याची पहिलीच वेळ : जलाशयात वाहन बुडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी जलाशय तुडुंब भरल्याने जलाशयाच्या काठावर असलेल्या रस्त्यापर्यंत पाणी आले आहे. ज्या ठिकाणी टेम्पो बुडाला त्याठिकाणी उतार आहे. त्यातच या ठिकाणी खडकाळ जमीन असल्याने वाहन रुतले नाही. उतारावरुन सुमारे २५० फुटापर्यंत हे वाहन गेल्याने शोधमोहिमेत अनेक अडचणी आल्या. सुमारे 500 बघ्यांनी परिसरात उपस्थिती लावल्याने घटनेची चर्चा सुरू होती.



Tempo sinks in Rakskop Reservoir Belgaum


#Belgaum #RakskopReservoir #TempoAccident #RescueMission #WaterRescue #BelgaumNews #EmergencyResponse #VehicleRecovery #SearchOperation #LocalNews #CommunitySupport #SafetyFirst #AccidentInvestigation #WaterSafety #RescueTeam #PublicAwareness #DisasterResponse #BelgaumDistrict #NewsUpdate #BreakingNews



Tags