बेळगाव : मि. कर्नाटक श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावला 9 पदके @कर्नाटक #bodybuilding
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : दावणगिरी येथील मोती वीराप्पा महाविद्यालयाच्या मैदानावर कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना आणि दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित मि. कर्नाटक श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत उडुपीचा धीरजकुमार किताबाचा मानकरी ठरला. तर बेस्ट पोझर झाकीर हुल्लर (धारवाड) ठरला. या स्पर्धेत स्पर्धे बेळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
५५ किलो गटात कृष्णकुमार उडुपी, गोविंद पुजार गदग, सलमान खान शिमोगा, विजय धारवाड, अलोककुमार दावणगिरी.
६० किलो गटात शशिधर नाईक उडुपी, गजानन गावडे बेळगाव, रोनाल्ड डिसोजा मंगळूर, नागराज चिकमंगळूर व उदय मुरकुंबी बेळगाव.
६५ किलो गटात धीरजकुमार उडुपी, सोमशेखर कोरवी, झाकीर हुल्लूर धारवाड, अविनाश परीट बेळगाव,मुरली एस. कोलार.
७० किलो गटात व्यंकटेश ताशीलदार, मंजुनाथ कोल्हापूर, सुनील भातकांडे (तिघेही बेळगाव), हजहर पाशा व अर्जुन दावणगिरी.
७५ किलो गटात प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, वरूण दावणगिरी, संपतकुमार शिमोगा, वेणूगोपाल बंगळूर, शरण राज चिकमंगळूर.
८० किलो गटात राहुल मेहरवाडे हरिहर, गिरीश एम. धारवाड, प्रशांत खंन्नुकर, राहुल कलाल (दोघेबेळगाव).
८५ किलो गटात किरण व्ही. बी. बेळगाव, श्रीनिवास बंगळूर, अजर अहमद, अलीस सिंगापुरी, मोहम्मद मोमीन.
८५ किलोवरील गटात चरणकुमार उडुपी, नजीर उल्ला खान, मोहम्मद नूर मुल्ला चित्रदुर्ग, गितेश कारवार, अहमद हुसेन रायचूर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.
कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या आणि प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांक विजेत्यांनाआकर्षक चषक व रोरव बक्षीस देऊन गौरवण्यात आले. किताब विजेत्याला रोख ३० हजार रुपये, उपविजेत्याला २० हजार तर बेस्ट पोझरला १० हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे रुपये ५०००, ४०००, ३०००, २००० व १५०० तसेच पदक, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. मेन्स फिजिक स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे रुपये १५ हजार, १० हजार आणि पाच हजारची तीन बक्षिसे देण्यात आली.
#Belgaum #Karnataka #Bodybuilding #MrKarnataka #Fitness #Strongman #Bodybuilder #Competition #Champion #BestPoser #Udupi #Davanagere #Dharwad #GymLife #Muscle #Strength #Athlete #Weightlifting #Health #Sports #Victory