बेळगाव : आदित्य ठाकरे यांची मागणी बालिश @कर्नाटक CM
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : महाराष्ट्रातील शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे. ही मागणी बालिश आहे. कुणीही कुरघोडी केली तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.
सुवर्णसौध येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. म. ए. समितीच्या महामेळावा होऊ दिला नाही म्हणून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत सिद्धरामय्यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. कर्नाटक सरकारला महाजन अहवालातील शिफारसीच अंतिम आहेत. बेळगाव सीमाभाग कुणालाही केंद्रशासित करता येणार नाही. याचा अभ्यास करुन आदित्य यांनी मागणी करायची होती, असा सल्ला सिद्धरामय्यांनी दिला.
म. ए. समितीने सरकारविरुद्ध महामेळावा आयोजित केला होता. अशा प्रकारच्या वर्तणुकीसाठी कारवाई करणार का? असे विचारता कुणीही सरकारविरुद्ध कुरघोडी केली तर सरकार गप्प बसणार नसल्याचे ते म्हणाले.
#Belgaum #AdityaThackeray #Karnataka #ShivSena #PoliticalDemand #Siddaramaiah #BorderDispute #Governance #LegalAction #MahajanReport #Maharashtra #PoliticalDialogue #MediaInteraction #StatePolitics #CentralGovernance #RegionalIssues #PoliticalResponse #GovernmentAction #PublicDebate #CivicEngagement