बेळगाव : सौंदत्ती-यल्लम्मा मंदिर विकासासाठी ₹ 100 कोटी #development
Centre clears scheme for development of 40 tourist destinations across 23 States at a cost of ₹3295 crore
बेळगाव—belgavkar—belgaum : केंद्र सरकारच्या विशेष योजनेतून सौंदत्तीतील यल्लम्मा डोंगरावरील रेणुका मंदिर विकासासाठी ₹ 100 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फॉर डेव्हलपमेंट टुरिस्ट प्लेसीस योजनेंतर्गत देशातील प्रमुख पर्यटन स्थळांची निवड केली जात आहे. संबंधित स्थळाचा विकास जागतिक पातळीवर कण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात येत आहे.
सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावरील रेणुका मंदिर, बागलकोटमधील ऐहोळे, गदग जिल्ह्यातील लक्कुंडी पुरातन मंदिराच्या विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी संबंधित जिल्ह्याच्या पर्यटन खात्यातर्फे यादी पाठवण्यात आली होती. त्यानुसार रेणुका मंदिराकरिता १०० कोटी मंजूर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली होती. बेळगाव जिल्ह्यातील रेणुका मंदिराबाबतची सर्व माहिती त्यांनी दिली होती.
मोठी गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांचा जागतिक पातळीवर विकास करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे. त्याकरिता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फॉर डेव्हलपमेंट टुरिस्ट प्लेसीस योजना जारी करण्यात आली आहे. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ५० वर्षांकरिता बिनव्याजी २५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. या अनुदानातून राज्य सरकारांनी संबंधित स्थळांचा विकास करावा, असे सूचित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार ५० वर्षांसाठी सदर अनुदान बिनव्याजी देण्यात आले आहे. ५० वर्षांनंतर सदर निधी राज्य सरकारने केंद्र सरकारला परत करायचा आहे. याकरिता दीर्घकाळ मुदत आहे. केंद्राच्या योजनेची रक्कम वगळता राज्य सरकारने याआधीच रेणुका मंदिर परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत १६७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या अनुदानातून विकासकामे सुरु आहेत.
हॉकर्स झोन, क्यू कॉम्प्लेक्स, रोप वे, थीम पार्क, ओरिएंटेशन सेंटर, अन्नछत्र, बससाठी पार्किंग, बैलगाड्यांचे पार्किंग, प्रशासकीय ब्लॉक यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
जागतिक पातळीवर दर्जेदार सुविधा दिल्या जाणार आहेत. सौंदत्तीतील रेणुका मंदिराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. हे नेहमीचे गर्दीचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाला अध्यात्मिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत या स्थळाची निवड करण्यात आली. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली होती.
- जगदीश शेट्टर खासदार बेळगाव
The Centre has approved interest-free loans worth ₹3,295 crore to States for the development of tourism sites and infrastructure. As part of this initiative, 40 new projects have been identified across 23 States, Union Tourism Minister Gajendra Singh Shekhawat said on Thursday (November 28, 2024).
#Belgaum #RenukaTemple #TourismDevelopment #CapitalInvestment #TouristPlaces #GovernmentScheme #CulturalHeritage #SpiritualTourism #InfrastructureDevelopment #TouristAttraction #TravelIndia #ExploreBelgaum #HeritageSite #PilgrimageSite #TourismBoost #InvestmentInTourism #SustainableTourism #VisitIndia #TourismGrowth #BelgaumDiaries