बेळगाव : @राजहंसगड जमिनीचा सर्व्हे
- सगळ्याच वादग्रस्त जमिनीचा सर्व्हे
- सर्व्हे झालाच पाहिजे
- राजहंसगड येथील गावठाण व इतर वादग्रस्त जमीन
बेळगाव—belgavkar—belgaum : राजहंसगड गावातील सगळ्याच वादग्रस्त जमिनीचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीच्या बैठकीत निर्णय होणार आहे, अशी माहिती सुळगे-राजहंसगडचे पीडीओ बाहुबली जकाती यांनी दिली आहे.
राजहंसगड येथे गेल्या आठवड्यात 32 गुंठे गावठाणाचा सर्व्हे होणार होता. मात्र सर्व्हेअर गावात येऊनही सर्व्हे झाला नाही. सर्व्हे झालाच पाहिजे, अशी एका गटाची मागणी होती. तर सर्व्हे सगळ्याच वादग्रस्त जमिनीचा करा, अशी दुसऱ्या गटाची मागणी होती. त्यामुळे पीडीओंनी पुढाकार घेऊन सगळ्याच वादग्रस्त जमिनीचा एकत्रित सर्व्हे करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सर्व्हेअर माघारी गेले.
राजहंसगड गाव सुरवातीला देसूर मंडळ पंचायतीत होते. १९९४ ला हे गाव सुळगा (ये.) ग्राम पंचायतीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्राम पंचायतीकडे गावातील जमिनीबाबत १९९४ पासूनची कागदपत्रे आहेत. त्याआधीच्या १९७१ पासूनच्या कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. त्यासाठी देसूर ग्रामपंचायतीसह मच्छे, पिरनवाडी नगरपंचायतीतही चौकशी करण्यात येत आहे.
राजहंसगड येथील गावठाण व इतर वादग्रस्त जमिनीबाबत सर्व्हे करणारच आहोत. त्यासाठी त्यासाठी ग्रामपंचायत सभेत ठराव होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत ठरावानुसार पुढील कार्यवाही करु, असेही पीडीओ जकाती यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीकडे 5 एकरापेक्षा अधिक गावठाण आहे. त्या सर्व गावठाणाचा सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी काही जणांची केली आहे. केवळ ठराविक गावठाणाचा सर्व्हे न करता सर्व गावठाणाचा सर्व्हे करण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत सर्वसाधारण सभेत कोणता निर्णय होतोय, हे महत्वाचे ठरणार आहे.
#Belgaum #Rajhansgad #Survey #LandSurvey #ControversialLand #VillageSurvey #GramPanchayat #CommunityMeeting #LandRecords #LocalGovernance #SurveyDecision #VillageDevelopment #LandIssues #BelgaumDistrict #RuralDevelopment #SurveyReport #LandOwnership #PublicInterest #CommunityAction #LocalNews