सरकार एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार | 'new GST slab'
Govt hiking tax rates for common man
Rahul Gandhi claims govt to bring in 'new GST slab'
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टॅक्स स्लॅब संदर्भात एक पोस्ट केली आहे. भांडवलदारांना सवलती देऊन सर्वसामान्यांची लूट करण्यासाठी मोदी सरकार टॅक्समधून अधिक वसूली करण्याच्या तयारीत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
जीएसटीच्या वाढत्या संकलनादरम्यान, सरकार एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींवर जीएसटी वाढवण्याची योजना आहे. समजा सभ्या सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे, आणि दरम्यान सरकार 1500 रुपयांच्या वरच्या कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हा अन्याय आहे. अब्जाधीशांना टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी आणि त्यांची मोठी कर्जे माफ करण्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची लूट केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
सर्वसामान्य जनतेवर टॅक्सच्या बोजा टाकण्याच्या विरोधात आम्ही जोरदार आवाज उठवू आणि ही लूट थांबवण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असे राहुल गांधी यांनी म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
#NewGSTSlab #TaxHike #RahulGandhi #ModiGovernment #CommonMan #GSTIncrease #TaxReform #EconomicJustice #TaxBurden #CongressParty #SocialMedia #PublicOutcry #WeDemandJustice #Taxation #FinancialEquity #ConsumerRights #MiddleClassStruggle #WeWillFight #GovernmentAccountability #StopTheLoot