बेळगाव : आठवडाभर पावसाची शक्यता @कर्नाटक

0

 


बेळगाव : आठवडाभर पावसाची शक्यता @कर्नाटक





बेळगाव—belgavkar—belgaum @कर्नाटक : अरबी समुद्रात असणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता पुढे सरकली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सैल होत असून ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



फंगल चक्रिवादळामुळे गेल्या आठवडाभरात अनेकदा राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. आता पुढील दोन आठवड्यांमध्ये दोनवेळा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.



गेल्या आठवड्यात फेंगल चक्रिवादळ तमिळनाडूतून कर्नाटकात येऊन अरबी समुद्राच्या दिशेने गेले. त्यामुळे किनारपट्टी, दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यातून बाहेर पडत असतानाच आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचा अंदाज आहे. परिणामी १४ ते १८ डिसेंबर या काळात दक्षिण भागातील जिल्हे, किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ श्रीनिवास रेड्डी यांनीदिली आहे.


राज्यातील बहुतेक ठिकाणची पिके कापणीला आली आहेत. पुन्हा पावसाची शक्यता असल्याने याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ८ ते १२ डिसेंबरपर्यंत साधारण पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कोरडे वारे वाहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.


#Belgaum #Karnataka #RainForecast #WeatherUpdate #Cyclone #ArabianSea #BengalBay #HeavyRain #Monsoon #Agriculture #CropHarvest #WeatherAlert #RainySeason #ClimateChange #Nature #Storm #WeatherConditions #RainyDays #SouthIndia #Meteorology

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)