बेळगाव : 18 आमदार एकत्र आल्यास एक दिवसामध्ये बेळगाव जिल्ह्याचे विभाजन
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा विभाजनाचा प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाला आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी आहे; मात्र येथील राजकीय परिस्थिती पाहून हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. जिल्हा विभाजन झाल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व पुन्हा निर्माण होईल, मात्र चार ते पाच वर्षांत जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघातील सर्व 18 आमदार एकत्र येऊन प्रयत्न केल्यास एक दिवसामध्ये जिल्ह्याचे विभाजन होईल, असे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले.
येथील सुवर्ण विधानसौध येथे शनिवारी अधिवेशनाची तयारी, सभागृहातील कामकाजाची माहिती आणि चर्चेला घेतल्या जाणाऱ्या विषयांवर माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, या भागाच्या विकासाला अनुसरून जिल्ह्याचे विभाजन होणार का, यावर बोलताना ते म्हणाले, जिल्हा विभाजनाचा मुद्दा यापूर्वीही चर्चेला घेण्यात आला होता, मात्र इथली राजकीय परिस्थिती पाहून हा मुद्दा प्रलंबित ठेवण्यात आला आहे. जिल्हा विभाजन झाल्यास म. ए. समितीचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. येथे किती टक्के कन्नड भाषिक राहतात,असा प्रश्नही त्यांनी केला.
दरम्यान, पत्रकारांनी सांगितलेल्या उत्तरावर त्यांनी न बोलताच मान डोलावून प्रतिउत्तर दिले. काही कन्नड पत्रकरांनी म. ए. समिती संपली असून, मराठी भाषिक राष्ट्रीय पक्षांकडे वळले असल्याचे सांगितले. येथील नागरिकांना बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चार ते पाच वर्षांमध्ये सीमाप्रश्न राहणार नाही. येथील नागरिकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धीटपणे निर्णय घेतल्याने हा बदल घडत आहे, असे ते म्हणाले.
तर विकासाच्यादृष्टीने जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचे विचारले असता ते म्हणाले, येथील खासदार व १८ आमदार एकत्र येऊन सरकारकडे गेल्यास एक दिवसांमध्ये जिल्हा विभाजन होईल. ही ताकद केवळ बेळगाव जिल्ह्यातील आमदारांमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.
#Belgaum #BelgaumDistrict #DistrictDivision #PoliticalUnity #MaharashtraEkikaran #KarnatakaPolitics #BelgaumMLAs #DevelopmentIssues #KannadaLanguage #MarathiSpeaking #PoliticalSituation #DistrictReorganization #BelgaumNews #LegislativeCouncil #LocalGovernance #CommunityDevelopment #PoliticalDialogue #RegionalDevelopment #UnityInDiversity #FutureOfBelgaum