माजी उपमुख्यमंत्र्यांना भांडी धुणे, बूट साफ करण्याची शिक्षा;
Akali Dal chief Sukhbir Badal ordered to clean utensils and shoes, perform guard duty at Golden Temple
- 'Wash utensils, clean bathrooms': Why Sikh high priests have punished SAD leader
- पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल
- श्री अकाल तख्त साहिबने धार्मिक शिक्षा ठोठावली
शीख समाजाची सर्वोच्च धार्मिक न्यायालय असलेल्या श्री अकाल तख्त साहिबने पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांना दोषी ठरवत धार्मिक शिक्षा सुनावली. Shiromani Akali Dal (SAD) President Sukhbir Singh Badal यांना अमृतसर येथील गुरूद्वारा साहिबमध्ये भांडी धुण्यासह इतर धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली.
सुखबीर सिंग बादल यांच्यासह १७ जणांना दोषी ठरवण्यात आले असून, यात माजी कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. आजपासून (३ डिसेंबर) सुखबीर सिंग बादल यांनी शिक्षा भोगण्यास सुरुवात केली. श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर सिंग बादल यांना ९३ दिवसांपूर्वी धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. २००७ ते २०१७ या काळात शिरोमणी अकाली दलाचे सरकार पंजाबमध्ये होते. या काळात केलेल्या चार चुकांच्या प्रकरणात श्री अकाली तख्त साहिबने दोषी ठरवले. ४ तास शिक्षेवर सुनावणी झाल्यानंतर हा निकाल दिला.
सुखबीर सिंग बादल हे दोन वेळा पंजाबचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. १६ वर्षे शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष राहिले. दिवंगत प्रकाश सिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते. श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर सिंग बादल यांना १३ वर्षापूर्वी दिलेला फख्र ए कौम किताब परत घेतला आहे.
माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या सरकारवर आरोप करण्यात आला होता की, २०१५ मध्ये पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब चुकीच्या वर्तनाप्रकरणातील दोषींना शिक्षा दिली नाही. श्रीगुरू गोविंद सिंहजी यांच्याप्रमाणे वेशभूषा करून अमृत शिंपडल्या प्रकरणात गुरमीम राम रहीम सिंहला माफी मिळवून दिली. ज्या काळात या घटना घडल्या, त्यावेळी सुखबीर सिंग यांचे वडील प्रकाश सिंग बादल मुख्यमंत्री होते. ३० ऑगस्ट रोजी श्री अकाल तख्त साहिबने धार्मिक गैरवर्तन केल्याचे घोषित केले होते.
श्री अकाल तख्त साहिबने शिक्षा सुनावल्यानंतर सुखबीर सिंग बादल मंगळवारी सकाळी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आले. त्यांच्या गळ्यात शिक्षेचा बोर्ड होता. दारात त्यांनी सेवा बजावली. सुखबीर सिंग यांना भांडी घासणे, बूट साफ करणे, कीर्तन ऐकणे अशी शिक्षा देण्यात आली आहे. तर काही दोषींना शौचालये साफ करण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
Five high priests of the Sikh community headed by Akal Takht Jathedar Giani Raghbir Singh on Monday pronounced 'tankhah' (religious punishment) to Shiromani Akali Dal (SAD) President Sukhbir Singh Badal.
The working committee of the party was directed to accept Sukhbir's resignation and report back to the Akal Takht within three days besides forming a committee to hold elections for the post of SAD president and office-bearers within six months.
The Fakhr-e-Quom title conferred on late former chief minister Parkash Singh Badal has also been withdrawn as he was the chief minister when 'mistakes' were committed that hurt the Sikh community and its sentiments. The Takht termed the 'mistakes' as nothing short of sin (gunah).
Sikh ministers in the SAD-BJP government and the party’s core committee members were held guilty of religious misconduct for taking 'controversial' decisions during the SAD's tenure from 2007 to 2017.
#SukhbirBadal #ShiromaniAkaliDal #GoldenTemple #AkalTakht #PunjabPolitics #ReligiousPunishment #SikhCommunity #Amritsar #PoliticalAccountability #JusticeForSikhs #CleansingCeremony #SikhTradition #LeadershipResponsibility #CulturalHeritage #SikhFaith #PublicService #CommunityService #EthicalLeadership #SikhValues #PoliticalEthics