एकनाथ शिंदे 'ॲक्टिव्ह मोड'वर #MaharashtraCM The suspense over who will be Maharashtra's new CM
Eknath Shinde not delaying announcement to name CM
खातेवाटपावर तोडगा निघणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस झाले तरी अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल देऊनही महायुती सत्तास्थापनेचा दावा करू शकलेली नाही. आधी मुख्यमंत्रीपद व आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष भाजपा व शिवसेनेत (शिंदे) रस्सीखेच चालू आहे.
महायुतीत सुरू असलेला मंत्रिपद वाटपाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्रिपदासह अन्य महत्त्वाची खाती कोणाकडे असणार, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील आजारी असल्याने महायुतीतील चर्चेला ब्रेक लागला होता. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका होणार आहेत.
महायुतीमध्ये शिंदेसेनेला 12 ते 13 तर अजित पवार गटाला 8 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 22 ते 24मंत्रिपदे मिळू शकतात. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे असा त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांचा आग्रह आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील अशी दाट शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपला, उपाध्यक्षपद अजित पवार गटाला, विधान परिषदेचे सभापतीपद शिंदेसेनेला तर उपसभापतीपद भाजपला दिले जाऊ शकते.
6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील विविध नेत्यांना भेटतील. मागील दोन दिवस ठाण्यात असूनही तब्ब्येत बरी नसल्याने शिंदे यांनी आमदार-खासदारांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या. त्यामुळे आज ते मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना भेटतील. तसंच सत्तेत आपला वाटा कसा असावा, याबाबत ते शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही लवकरच होऊ शकते. याच बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाण्याची शक्यता आहे.
While the answer to the Maharashtra chief minister question is now deducible with Devendra Fadnavis's being widely seen as the pick for the top post, members of the National Democratic Alliance (NDA) continue to huddle in the run-up to the swearing-in ceremony of the new government in the state, slated to take place on December 5.
#MaharashtraCM #EknathShinde #PoliticalDrama #MaharashtraPolitics #NewGovernment #Mahayuti #BJP #ShivSena #AjitPawar #CabinetFormation #PoliticalTension #LeadershipChange #ElectionResults #GovernmentFormation #MaharashtraAssembly #PoliticalNegotiations #ChiefMinister #PoliticalUpdates #MaharashtraNews #GovernmentCrisis