हॉरिबल राजकारण...! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते?
Who will be Maharashtra's next CM?
- अंजली दमानियांची पोस्ट, महायुतीत नेमके काय राजकारण?
- भाजपा ५ डिसेंबरला शपथविधी करण्याच्या तयारीला
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे कयास
- शपथविधीला शिंदे असतील का असाही सवाल
महाराष्ट्रात जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करणार आहे. निवडणुकीचे निकाल लागून आता १० दिवस उलटले तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत स्पष्टता दिसत नाही. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. तसेच ईव्हीएमविरोधातील लढाई तीव्र केली आहे. या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.
दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते बनू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. शिंदेना मुख्यमंत्री पद नाही तर मग विरोधी पक्ष नेते पद देऊन सरकारही आपलेच, विरोधी पक्षनेताही आपलाच अशी रणनिती भाजपा आखत असल्याचा अंदाज दमानिया यांनी केला आहे. शिंदेंना विरोधी पक्षात बसविण्याची भाजपाचीच रणनिती असू शकते. शिंदेंना काय हवे नको ते पुरविले जाईल व विरोधी नेताही यांचाच होईल, बाकी सगळे साफ, असेच होताना दिसतेय, असे सूचक ट्विट दमानिया यांनी केले आहे. ४ दिवसांपूर्वी भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कुछ काला है, असा संशय दमानिया यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री कोण होणार हे प्रचंड बहुमत मिळविलेल्या महायुतीला ठरविता येत नाहीय. महायुतीचे सारे काही घोडे अडलेले आहे ते एकनाथ शिंदेंच्या मागणीवर. शिंदे काही मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीत. सोडलेच तर गृहमंत्री पद, अर्थमंत्री पद द्यावे अशी मागणी त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यात केलेली आहे. याला भाजपाने होकार दिलेला नाही.
भाजपा ५ डिसेंबरला शपथविधी करण्याच्या तयारीला लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे कयास बांधले जात आहेत. परंतू, या शपथविधीला शिंदे असतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. शिंदे दिल्लीवरून परतल्यानंतर सारखे आजारी पडत आहेत. शिंदे गावी जाऊन आजारी पडले होते. गावी जाण्यापूर्वी शिंदेंनी महायुतीची बैठक रद्द केली होती.
#MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #MahaYuti #CMControversy #PoliticalDrama #ElectionResults #BJP #OppositionLeader #GovernmentFormation #PoliticalSpeculation #ShivSena #MaharashtraCM #PoliticalStrategy #AnjaliDamania #PoliticalAnalysis #EVMControversy #LeadershipCrisis #PoliticalDebate #MaharashtraElections