बेळगाव : क्रीडापटूंना हजेरीत 25 टक्के सवलत आणि 10 ग्रेस मार्क्स @कर्नाटक
Grace marks, 25% attendance for sports students
Karnataka to grant attendance, grace marks for student athletes: CM Siddaramaiah
बेळगाव-belgavkar : Siddaramaiah hints at decision on grace marks for Karnataka athletes : क्रीडापटूंना हजेरीत 25 टक्के सवलत आणि 10 ग्रेस मार्क्स देण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
कर्नाटक ऑलिम्पिक संघटनेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. क्रीडापटूंना हजेरील सवलत आणि ग्रेस मार्क्स देण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन क्रीडापटूंना प्रोत्साहन दिले जाईल, असे ते म्हणाले.
गेल्या २२ वर्षांपासून ऑलिम्पिक संघटनेतर्फे पुरस्कार वितरण केले जात आहे. क्रीडापटूंना सर्वतोपरी मदत देण्यासाठी तयार आहे. अर्थसंकल्पामध्ये क्रीडाक्षेत्रासाठी भरीव अनुदानाची तरतूद केली आहे. ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके मिळवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवणाऱ्यांना ६ कोटी रुपये, रौप्यपदक पटकावणाऱ्यांना ४ कोटी रुपये घोषित केले आहेत. पण,आतापर्यंत कुणीही पदक मिळवून दिले नाही. ऑलिम्पिक संघटनेकडून नेहमीच त्याकरिता प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक छोटे देश मोठ्या पदकांची कमाई करताना दिसतात. पण, भारत मोठा देश असून क्रीडापटूंना पुढे येण्यासाठी प्रोत्साहनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
Karnataka Chief Minister Siddaramaiah announced that the state government is considering granting student athletes a 25 per cent attendance concession and 10 grace marks in educational institutions.
Speaking at the Karnataka Olympic Association (KOA) award distribution ceremony in Bangalore, the Chief Minister emphasised the government’s commitment to supporting students engaged in sports by reducing academic pressures and encouraging athletic pursuits.
#Belgaum #SportsDiscount #Karnataka #AthleteSupport #GraceMarks #EducationInSports #StudentAthletes #SportsIncentives #KarnatakaSports #BelgaumEvents #AthleticExcellence #ScholarshipOpportunities #SportsCommunity #YouthSports #EmpowerAthletes #SportsRecognition #AcademicSupport #KarnatakaEducation #BelgaumSports #IncentivesForAthletes