शिंदेंनी अचानक सर्व बैठका रद्द केल्या | Maharashtra CM Race
अजित पवार दिल्लीला जाणार
महाराष्ट्र : Maharashtra CM Race : दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी माहिती समोर येत आहे. पहिल्या दिवसापासून हे सुरु आहे. पण तो दिवस सूर्य अजून उजाडत नाही. अजून हा महिना संपायचा आहे. नोव्हेंबर आता संपेल नंतर डिसेंबर उजाडेल. त्यानंतर ५ तारीख येईल.
दोन दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री गावी गेले होते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील मूळ गावी दरे येथे आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या शरीराचे तापमान 105 डिग्री असल्याने त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार करण्यात आले. तिथे त्यांना ताप आला होता. तो ओसरताच ते मुंबईत परतले आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात गृहमंत्री पदासह महत्वाची खाती मागितल्याची चर्चा होत आहे. या कारणामुळे महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबत चालला आहे. आज शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार होती. परंतू, शिंदेंनी आजच्या बैठकाही रद्द केल्या आहेत.
NDA meeting postponed to Dec 3 owing to Shinde's ill-health
शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलविली होती. ती बैठकही रद्द करण्यात आली आहे. तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांनी शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. या कारणाने शिंदेंनी सर्व बैठका रद्द केल्या आहेत. यामुळे या नेत्यांची बैठकही रद्द झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार हे दिल्लीला जाण्यासाठी निघणार आहेत. बैठक रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला का जात आहेत, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तिकडे भाजपाने ५ डिसेंबरला शपथविधी घेण्याची तयारी सुरु केली आहे. फडणवीस यांना भेटण्यासाठी राज्यातील नेते, आमदारांनी सागर बंगल्यावर रीघ लावलेली आहे. यामुळे राज्यात काय होणार, शिंदे सरकारबाहेर बसणार की सरकारमध्ये मिळेल ती खाती घेऊन थांबणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Amid speculation that his son Shrikant Shinde might get the deputy CM's post and Shiv Sena is keen on the Home portfolio, Eknath Shinde said the Mahayuti allies- BJP, NCP, and Shiv Sena- will decide the government formation through consensus after sitting together.
Meanwhile, Nationalist Congress Party (NCP) chief Ajit Pawar will be flying to Delhi to participate in the Maharashtra government formation exercise.
The name of Devendra Fadnavis has been finalised as the new chief minister of Maharashtra who will be elected as the legislature party leader in a meeting to be held either on December 2 or 3, a senior BJP leader claimed.
#APKFraud #CyberCrime #OnlineSafety #FraudAlert #Belgaum #WhatsAppScam #BankingFraud #ProtectYourself #StaySafeOnline #APKFiles #CyberSecurity #FraudPrevention #ScamAwareness #MobileSecurity #DigitalFraud #FraudAwareness #CyberAwareness #SecureYourBank #AvoidScams #StayInformed