बेळगाव ते बंगळूर व बंगळूर ते बेळगाव थेट विमान सेवा...

0


बेळगाव ते बंगळूर व बंगळूर ते बेळगाव थेट विमान सेवा...






  • अधिवेशन काळात बंगळूर, बेळगाव विमानसेवा
  • मंत्री, आमदारांची होणार प्रवासाची सोय
  • खास अधिवेशनसाठी तात्पुरती सोय 


बेळगाव—belgavkar—belgaum : सांबरा विमातळावरुन बेळगाव ते बंगळूर व बंगळूर ते बेळगाव थेट विमान सेवा दि. 9 ते दि. 19 डिसेंबर अधिवेशन काळात सुरु होणार आहे. त्यामुळे मंत्री, आमदारांची प्रवासाची सोय होणार आहे. यासाठी इंडिगो कंपनीने पुढाकार घेतला आहे अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. 


बेळगाव शहरात हिवाळी अधिवेशनची तयारी शहरात जोमात सुरू आहे. हॉटेल, हॉस्टेल बुक झाले आहेत. दि. 9 डिसेंबरपासून हालगा येथील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन भरवण्यात येणार आहे. बंगळूरहून बेळगावला सकाळी 6 वाजता इंडिगो कंपनीचे (एअरबस फ्लाईट) उड्डाण घेणार आहे. ते सकाळी 7 वाजता सांबरा विमानतळावर पोहोचणार आहे. 


सायंकाळी सांबरा विमानतळावरुन ते बंगळूरला जाण्यासाठी विमान 7.30 वाजता उड्डाण भरणार असून बंगळूरला ते सायंकाळी 8.30 वाजता पोहोचणार आहे. ही विमानसेवा दि. 9 ते दि. 19 या कालावधीतच राहणार आहे. कारण खास अधिवेशनसाठी तात्पुरती सोय आहे.



Belgaum to Bangalore from Sambar Airport


Bangalore to Belgaum direct flight service 9 to December 19 during the session


#Belgaum #Bangalore #DirectFlight #IndiGo #SambarAirport #WinterSession #TravelConvenience #FlightService #LegislativeSession #AirTravel #BelgaumToBangalore #BangaloreToBelgaum #AviationNews #SessionTravel #FlightSchedule #ConvenientTravel #AirbusFlight #TemporaryService #GovernmentTravel #BelgaumAirport

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)