संसदेत खासदाराच्या बाकाखाली नोटांचे बंडल #Parliament #CashFound #RajyaSabha

0

 


संसदेत खासदाराच्या बाकाखाली नोटांचे बंडल #Parliament #CashFound #RajyaSabha





Rajya Sabha Chairman says bundle of currency notes found from Congress MP Abhishek Singhvi's seat


Cash found from Parliament seat allotted to Abhishek Manu Singhvi, probe ordered





Rs 50000 found under Abhishek Manu Singhvi's Parliament seat, probe ordered : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली नोटांचे बंडल (₹ 50000) सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. 



राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. सकाळी 11:13 वाजता सभापतींनी या नोटांच्या बंडलाचा उल्लेख करत, हा प्रकार 222 नंबरच्या सिटवर घडला आहे, आणि ही सिट काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांची आहे, असे स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.






या आरोपांवर उत्तर देताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. त्या नोटा माझ्या नाहीत. त्यांनी या प्रकरणात स्वतःचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, सभागृहात हा मुद्दा उचलून धरत इतर विरोधी पक्षांनीही यावर आक्षेप घेतला आहे. या नोटा खऱ्या आहेत की खोट्या, याबाबत तपास सुरु हे. संसद भवनाच्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम देखील सुरु आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत देशभरात राजकीय वातावरण तापलेले राहील, असे दिसत आहे.






भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेला "निंदनीय" असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. संसद ही देशाच्या लोकशाहीची पवित्र जागा आहे आणि अशा घटनांनी तिची प्रतिमा डागाळते. भाजपने या प्रकरणाची जलद चौकशी आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.



Vice President and Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar on Friday informed the House that cash  (₹ 50000) was recovered during the checking from seat number 222 allotted to Congress member Abhishek Manu Singhvi in Rajya Sabha. He said the security officials recovered the bundle of currency notes on Thursday. This created a huge uproar in the upper house of Parliament, with the government and opposition attacking each other. 


#Parliament #AbhishekSinghvi #CashFound #RajyaSabha #PoliticalScandal #IndiaPolitics #CongressParty #ProbeOrdered #JagdeepDhankhar #BJP #Democracy #PoliticalUproar #CCTVFootage #CurrencyNotes #PoliticalDrama #WinterSession #Corruption #PoliticalAccountability #Government #Opposition


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)