मोदींच्या मागे मागे चालणारी तरुणी कोण...?

0

 


मोदींच्या मागे मागे चालणारी तरुणी कोण...?






  • नरेंद्र मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे
  • मोदी समर्थक-विरोधक भिडले
  • नेमकं प्रकरण काय? 



Photo of ‘Lady SPG commando’ near PM Modi goes viral


Picture of woman commando walking behind PM Modi goes viral | What's the reality behind photo? : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका तरुणीमुळे चर्चेत आले आहेत. मोदी हे भारतातच नाही तर जगातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याने सोशल मीडिया पोस्टवर संपूर्ण जगाचं लक्ष असतं. सध्या अशीच एक अगदी छोटीशी गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. मोदींचा या तरुणीबरोबरचा फोट व्हायरल होत आहे. यावरुन आता मोदी समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. 



27 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये मोदी एका व्यक्तीबरोबर चालताना दिसत असून त्यांच्या मागे एक तरुणी चालताना दिसत आहे. मात्र ही तरुणी या फोटोत काय करत आहे याबद्दलची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील (एसपीजी) कमांडो आहे (Special Protection Group (SPG)). अनेकांनी मोदींचा हा फोटो व्हायरल केला असून पहिल्यांदाच एसपीजीमध्ये महिला कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला आहे.



एसपीजीअंतर्गत येणाऱ्या क्लोज प्रोटेक्शन ग्रुप (सीपीटी) टीममधील ही महिला असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणी येऊ नये म्हणून हे कमांडो तैनात केलेले असतात. सध्या एसपीजीमध्ये 100 महिला कमांडो आहेत. यापूर्व राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या सुरक्षेसाठी महिला एसपीजी कमांडो तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र पंतप्रधानाच्या सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जात आहे. याच कारणामुळे मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे.



पहिल्यांदाच महिला एसपीजी कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी एसपीजीमध्ये 2013 पासून या विशेष दलातील महिलांना पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये सामावून घेण्यात आलं आहे. 


2013 मध्ये पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौर यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असल्याचं दिसून आलं होतं. हा फोटोही आता मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्या सुरक्षेत महिला एसपीजी तैनात करण्यात आले आहेत, हा दावा खोडून काढण्यासाठी व्हायरल होताना दिसत आहे. 



एसपीजीची स्थापना 1985 साली करण्यात आली होती. या एसपीजी कमांडोंची सुरक्षा देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईकांना पुरवली जाते. माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारीही याच तुकडीवर असते.


A picture shared by BJP MP and actor Kangana Ranaut, showing a female ‘commando’ standing behind Prime Minister Narendra Modi outside Parliament, has gone viral on social media. While many speculate that the woman in the photo is part of the Special Protection Group (SPG), here’s what you need to know


#Modi #ViralPhoto #LadySPGCommando #WomenInSecurity #SPG #NarendraModi #SocialMediaBuzz #PoliticalDebate #WomenEmpowerment #IndianPolitics #SecurityForces #ViralNews #TrendingNow #WomenInLeadership #CloseProtection #SPGWomen #ModiSupporters #ModiOpponents #CurrentAffairs #IndiaNews
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)