डोनाल्ड ट्रम्पमुळे या उद्योगाला झटका बसणार? #BRICS #ImportDuties
Will impose series of tax incentives
- Donald Trump hints at tariffs on steel imports
- डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- आयातीवर शुल्क लादण्याचे संकेत
Donald Trump hints at tariffs on steel imports that could impact Indian exports : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या जानेवारी महिन्यात २० तारखेला अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या घोषणा करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भारतासह ९ देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ संघटनेला (BRICS is an acronym for Brazil, Russia, India, China, and South Africa) अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्यास १०० टक्के आयात शुल्क लादण्यासह व्यापार बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी जगभरातील पोलाद उद्योगांची चिंता वाढवणारी घोषणा केली आहे.
भारतीय पोलाद उद्योग सध्या आव्हानांचा सामना करत आहे, अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. भारतीय पोलाद उद्योग सध्या निर्यातीमध्ये झालेली मोठी घट आणि देशात वाढलेली पोलादाची आयात या संकटांचा सामना करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील पोलाद आयात ४१ टक्क्यांनी वाढली आहे, तर निर्यात ३६ टक्क्यांनी घटली आहे. यातच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकन पोलाद उद्योगांच्या रक्षणासाठी देशात आयात होणार्या पोलादावर आणखी शुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी जपानच्या निप्पॉन स्टील कंपनीला पेनसिल्वेनिया येथील पोलाद निर्मिती उद्योग यूएस स्टीलचे अधिगृहण करण्यापासून रोखणार असल्याचेही जाहीर केले आहे.
अमेरिकेतील यूएस स्टील या स्थानिक पोलाद उद्योगाबाबद बोलताना ट्रम्प म्हणाले की, कधीकाळीची महान आणि शक्तिशाली कंपनी यूएस स्टील, ही जपानच्या निप्पॉन स्टील या एका परदेशी कंपनीने विकत घ्यावी, याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. कर आणि शुल्कांमध्ये सूट देऊन आपण यूएस स्टील कंपनीला पुन्हा मजबूत आणि महान बनवूयात आणि हे अगदी वेगाने केले जाईल. राष्ट्राध्यक्ष म्हणून मी हा करार होण्यापासून थांबवेल. विकत घेणार्यानी सावध व्हावे, अशी घोषणाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
यादरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच पोलाद मंत्रालयाने पोलाद उद्योगाशी संबंधितांबरोबर सोमवारी एक बैठक घेतली, ज्यामध्ये पोलाद उद्योगाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पोलाद उद्योगासमोरील आव्हाने लक्षात घेत मंत्रालयाने काही ठराविक पोलादी वस्तूंवर २५ टक्के सेफगार्ड ड्युटी लावण्याचा प्रस्ताव सादर केला.
At a time when Indian steel companies are witnessing a sharp decline in steel exports, US President-elect Donald Trump on Tuesday signalled potential fresh tariffs on imported steel to safeguard the American steel industry. Trump said that he would even block Nippon Steel, a Japanese company, from acquiring the Pennsylvania-based steel manufacturer, US Steel.
#DonaldTrump #SteelTariffs #IndianExports #USSteel #TradePolicy #BRICS #ImportDuties #EconomicImpact #SteelIndustry #TaxIncentives #GlobalTrade #Manufacturing #TradeWar #USEconomy #ExportChallenges #IndustryNews #PoliticalDecisions #MarketTrends #BusinessImpact #EconomicGrowth