एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री #EknathShinde #Maharashtra #DeputyCM

0

 


एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री #EknathShinde #Maharashtra #DeputyCM



 



Eknath Shinde to take oath as Maharashtra's deputy CM



महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना सन्मान मिळाला पाहिजे असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच, “एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करून त्यांना सन्मान देणार असल्याचं फडणवीसांनी मला सांगितलं आहे”, असंही आठवले म्हणाले. 






केंद्रीय राज्यमंत्र्यांनी त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षासाठी फडणवीसांकडे महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये एक मंत्रीपद मागितलं आहे. आठवले यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नव्हता त्या काळात आठवले यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने देवेंद्र फडणवीसांची बाजू मांडली होती. फडणवीस पुढचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी भूमिका त्यांनी अनेकदा मांडली. त्यापाठोपाठ आता आठवले आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.





महायुतीत त्यांना योग्य सन्मान मिळेल आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर त्यांना महायुतीचं अध्यक्षपद किंवा संयोजकपद द्यावं असंही मी सुचवलं आहे. शेवटी एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा आदर राखणं आवश्यक आहे, ही भूमिका मी मांडली आहे. यासह मी आरपीआयसाठी एका मंत्रीपदाची मागणी केली आहे.




Eknath Shinde, who bowed out of the race for Maharashtra's Chief Minister post last week and has been keeping a low profile since, will join the Devendra Fadnavis government as his Deputy. 




Mr Fadnavis will take oath in Mumbai, preparations for which are in progress. There is speculation that two Deputies will take oath alongside - Ajit Pawar has already given a teaser, saying he would also take oath today.

#EknathShinde #Maharashtra #DeputyCM #DevendraFadnavis #PoliticalNews #MaharashtraPolitics #GovernmentFormation #IndianPolitics #BJP #Mahayuti #RamdasAthawale #RepublicanParty #PoliticalLeadership #Mumbai #OathCeremony #PoliticalUpdates #Elections2023 #Leadership #PoliticalStrategy #RespectAndHonor


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)