बेळगाव-पुणे, बेळगाव-बंगळूर वंदे भारत रेल्वे... #VandeBharat
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे वंदे भारत सेवेच्या विस्ताराबाबत लेखी प्रश्न विचारला होता. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी बंगळूर-बेळगाव मार्गावर सध्या 15 नियमित रेल्वे सेवा धावत आहेत. पुणे-हुबळी मार्गावर 17 रेल्वे रोज सेवा देत आहेत. त्यात वंदे भारत एक्सप्रेस समाविष्ट आहे. त्यामुळे सद्या प्रवाशांची गैरसोय होत नाही, असे लेखी उत्तर खासदार शेट्टर यांना पाठवले आहे. त्यामुळे तुर्तास तरी बेळगाव ते पुणे, बंगळूर वंदे भारत रेल्वे मागणी लांबणीवर पडली आहे.
रेल्वे मंत्र्यांनी खासदार शेट्टर यांच्या प्रश्नांना थेट उत्तर न दिल्याने काही शंका उपस्थित झाल्या आहेत. खासदार शेट्टर यांनी वंदे भारत सेवा बेळगाव-बंगळूर मार्गावर सुरु करणे, हुबळी-पुणे मार्गावर सेवा वाढवणे असे मुद्दे मांडले होते. सद्या हुबळी-पुणे मार्गावर 3 दिवस वंदे भारत एक्सप्रेस धावते. याशिवाय पुणे-हुबळी मार्गावर एक विशेष ट्रेन देखील सुरु करण्यात आली आहे.
वंदे भारत सेवा वाढवण्याबाबत निर्णय संसाधनांच्या उपलब्धतेवर, कार्यक्षमतेवर आणि वाहतुकीच्या गरजांवर आधारित घेतला जातो. यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आणि कार्यक्षमतेनुसार सेवांची पुनरावलोकन व समायोजन होईल, असेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी नमूद केले आहे.
बंगळुर-बेळगाव मार्गावर वंदे भारत सेवा सुरु करण्याबाबत आणि हुबळी-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस तारीख ठरवण्याबाबत मंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देण्यात टाळाटाळ केली. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत सेवा विस्ताराबाबत सध्याच्या परिस्थितीवर आधारित उत्तर दिले असून यामध्ये खासदार शेट्टर यांच्या प्रश्नांची थेट आणि स्पष्टीकरणात्मक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वंदे भारताच्या विस्ताराचा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे.
#Belgaum #Pune #Bengaluru #VandeBharat #IndianRailways #RailwayExpansion #TrainServices #BelgaumToPune #BelgaumToBengaluru #RailwayMinister #JagdishShettar #AshwiniVaishnaw #TrainTravel #PassengerServices #RailwayUpdates #ExpressTrain #HubliPune #RailwayDemand #TrainSchedule #TravelIndia