गायब झालेली थंडी पुन्हा येणार? #IMD

0

 


गायब झालेली थंडी पुन्हा येणार? #IMD





हिवाळ्यात पाऊस अन् गुलाबी थंडी गायब 

गायब झालेली थंडी आता परतणार



बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने दक्षिण भारतात धुमाकूळ घालत होता. यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला. फेंगल चक्रीवादळामुळे थंडीने आठवडाभर विश्रांती घेतली होती. तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला आहे.




बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे आणखीन एक-दोन दिवस हवामान ढगाळ राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र गायब झालेली थंडी पु्न्हा परत येणार आहे.




किमान तापमानात पुढील दोन दिवसांत एक ते दोन अंशाने घट होईल. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा गायब झालेल्या थंडीला सुरवात होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण भारतासह मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आणि थंडी गायब झाली.





पुढील 24 तासांत काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानंतर हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.



#WinterIsComing #WeatherUpdate #CycloneFengshen #IMD #RainyDays #ColdWeather #SouthIndia #TamilNadu #Puducherry #Karnataka #UnseasonalRain #TemperatureDrop #WeatherForecast #ClimateChange #Meteorology #WeatherAlert #ColdFront #SeasonalChanges #NatureLovers #StayWarm

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)