बेळगाव : मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार काय? @कर्नाटक

0



बेळगाव : मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार काय? @कर्नाटक





Karnataka cabinet expansion unlikely : D K Shivakumar



  • Karnataka Deputy Chief Minister DK Shivakumar 
  • political decisions cannot be shaped by debates 
  • Karnataka Pradesh Congress Committee (KPCC)
  • DK Shivakumar opposes media debates on political matters



बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : राज्यातील 3 मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत चर्चा सुरु झाली होती. प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याचेही वृत्त व्हायरल झाले होते. पण, पक्षश्रेष्ठींनी शुक्रवारी या सर्व चर्चेला ब्रेक लावला आहे. लवकरच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका होईपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, प्रदेशाध्यक्षपदी डी. के. शिवकुमारच असतील, असे श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे.






विधानसभा पोटनिवडणुकीचानिकाल गेल्या शनिवारी जाहीर झाला. यामध्ये शिग्गाव, चन्नपट्टण आणि संडूर या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. दोन मतदारसंघांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांची मुले रिंगणात होती. केंद्रामध्ये त्या दोघांचाही प्रभाव असतानादेखील ते आपल्या मुलांना विजयी करू शकले नाहीत. मतदारांनी काँग्रेस सरकारला कौल दिला. त्यामुळे सध्यातरी कोणताही बदल करण्याचा विचार नसल्याचे श्रेष्ठींनी कळवले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार तसेच काहीजण दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीत भाग घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी श्रेष्ठींची भेट घेऊन मंत्रिमंडळ पुनर्रचना तसेच प्रदेशाध्यक्षपद बदलण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. श्रेष्ठींनी आगामी काळात जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली. घोषणा झाल्यास एप्रिलमध्ये निवडणुका होतील. त्यामुळे आता बदल केल्यास त्याचे परिणाम निवडणूक निकालावर होण्याची भीती आहे. तोपर्यंत मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि प्रदेशाध्यक्षपद हे दोन्ही विषय बाजूला ठेवावेत. पुढील निवडणुकांची तयारी करण्याची सूचना देण्यात आली. 




उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतरांची भेट घेऊन चर्चा केली. गेल्या पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपद सांभाळत आहे. विधानसभा निवडणुकीसह इतर निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. दोन्ही पदावर राहताना कामाचा बोजा वाटत असून प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले. पण, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका होईपर्यंत दोन्ही पदे सांभाळण्याची सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


बेळगावात ९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे. सध्या त्यावर लक्ष केंद्रित करावे. अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्यासह काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी श्रेष्ठींना सांगितले. पण, अधिवेशन उरकल्यानंतर खांदेपालट करावी असे सूचित करण्यात आल्याचे समजते.


Karnataka Deputy Chief Minister DK Shivakumar emphasised that political decisions cannot be shaped by debates conducted in front of the media. Speaking at Karnataka Bhavan in Delhi on Friday, he responded to questions about the potential contenders for the Karnataka Pradesh Congress Committee (KPCC) president's post, including ministers KN Rajanna and Satish Jarkiholi. “Discussing political matters in the media isn’t suitable for any party or individual,” Shivakumar asserted.



#Karnataka #DKShivakumar #Congress #Belgaum #PoliticalDebate #CabinetReshuffle #KPCC #Elections2023 #PoliticalNews #IndianPolitics #KarnatakaPolitics #CongressParty #ElectionResults #PoliticalStrategy #Leadership #StateElections #PanchayatElections #PoliticalLeadership #Government #PoliticalUpdates
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)