बेळगाव : महामेळावा घेतल्यास कारवाई #समिती #महामेळावा
- बेळगावात महामेळावा घेणारच
- महाराष्ट्र एकीकरण समिती
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगावात महामेळावा घेणारच, यावर महाराष्ट्र एकीकरण समिती ठाम आहे. परंतु, पोलिसांकडून याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. महामेळावा घेतल्यास म. ए. समितीविरोधात कारवाई केली जाईल, असे वक्तव्य राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एच. हितेंद्र यांनी केले आहे.
अधिवेशन पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी ते बेळगावला आले होते. तयारीची पाहणी करून त्यांनी बेळगाव जिल्हा व आयुक्तालयाच्या अखत्यारितील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एडीजीपी हितेंद्र म्हणाले, बेळगावात अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दरवर्षी महामेळावा आयोजित केला जातो. गेल्या वर्षी परवानगी न दिल्याने त्यांनी सीमाभागात महाराष्ट्राच्या हद्दीत जाऊन महामेळावा भरवला. यावेळीही त्यांना परवानगी दिली जाणार नाही. यातूनही त्यांनी जर महामेळावा घेतला, तर त्यांच्यावर कारवाईची भाषा एडीजीपींनी केली आहे.
अधिवेशनाची सर्वतोपरी तयारी सुरु आहे. बाहेरुन बंदोबस्तासाठी येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व त्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातील, याचीही तयारी आहे. त्याची आपण स्वतः शहानिशा केली आहे.
#Belgaum #MaharashtraEkikaran #Maharashtra #BelgaumEvent #Protest #PoliceAction #PoliticalGathering #Unity #SocialJustice #CommunityMeeting #PublicSafety #LawAndOrder #EventPreparation #LocalPolitics #CivilRights #Demonstration #Gathering #Activism #BelgaumNews #MaharashtraPolitics