CM पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार...

0



CM पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार...






Maharashtra CM decision awaited, Shiv Sena rallies behind Eknath Shinde



Mahayuti's Delhi meet, Devendra Fadnavis billed as favourite for top post



महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याची चर्चा होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहेत. दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावरही चर्चा झाली आहे. 




निकाल लागून 6 दिवस झालेत, मात्र अद्यापपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतली, तो मान्य असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. यामुळे, शिवसेना व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद व इतर महत्त्वाची खाती देण्यात येतील, असं समीकरण सध्या पाहायला मिळत आहे.


एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे सध्या स्पष्ट झालं आहे. आता मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. एकनाथ शिंदे आता राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिली आहे.



एकनाथ शिंदे कदाचित मुख्यमंत्रिपदही स्वीकारणार नाहीत. एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाही. एकनाथ शिंदे यांना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असंही शिरसाट म्हणाले.



भाजप नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अन् त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलननाने घेतलेलं व्यापक स्वरूप यामुळे यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाजाच्या मतांचा कल अत्यंत महत्वाचा ठरला. अशातच आता सत्तास्थापनेच्या घडमोडींमध्ये देखील मराठा समाजाला दुखावलं जाऊ नये, असा सूर दिसतो आहे. विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीतही याच मुद्यावर चर्चा झाली.


#EknathShinde #MaharashtraPolitics #ShivSena #DevendraFadnavis #BJP #Mahayuti #CMDecision #MarathaReservation #PoliticalDrama #MaharashtraElections #GovernmentFormation #DelhiMeet #PoliticalStrategy #LeadershipChange #MaharashtraCM #ShindeGroup #PoliticalAlliance #ElectionResults #CabinetFormation #PoliticalNews


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)