बेळगाव : नंदगड धरणाजवळ पिकांचे हत्तींकडून नुकसान

0

 


बेळगाव : नंदगड धरणाजवळ पिकांचे हत्तींकडून नुकसान






बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतांची पाहणी केली असून, त्यांना योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.




खानापूर तालुक्यातील नंदगड गावाच्या धरणाजवळ असलेल्या शेतात हत्तीच्या एका कळपाने शेतकऱ्यांच्या भात पिकांचे व ऊस पिकांचे नुकसान केले आहे. नुकसानीची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, आता हत्तींच्या मुक्त संचारामुळे ऊस, भात पीक व केळ्याच्या झाडांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.



नंदगडचे शेतकरी नारायण वाद्रे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून हत्तीच्या कळपाने भाताच्या पिकांची हानी केली असून, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ३० पोती भाताचे नुकसान झाले आहे. यांच्या पिकांचेही नुकसान झाले असून, पाहणी करून योग्य नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Photo : नंदगड विभागाच्या वन अधिकारी माधुरी दलवाई आणि त्यांचे सहकारी, मन्जू

#Belgaum #Nandgad #Farmers #ElephantDamage #CropLoss #Agriculture #Wildlife #SupportFarmers #RiceCultivation #Sugarcane #NatureConservation #ForestDepartment #HelpFarmers #RuralLife #SustainableFarming #CommunitySupport #WildlifeProtection #CropInsurance #FarmAid #EnvironmentalAwareness

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)