SEBI च्या एका आदेशानं बड्या कंपनीच्या IPO ला ब्रेक

0

 


SEBI च्या एका आदेशानं बड्या कंपनीच्या IPO ला ब्रेक





C2C Advanced Systems Limited


  • सेबीकडून आलेल्या सूचनानंतर लिस्टिंग थांबवली
  • गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याचा अंदाज


C2C Advanced Systems Limited च्या आयपीओसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. Securities and Exchange Board of India (SEBI) नं  सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेड च्या Initial Public Offering (IPO) च्या लिस्टिंगला स्थगिती दिली आहे. सेबीनं  जोपर्यंत कंपनी दोन अटींची पूर्तता करत नाही तोपर्यंत आयपीओची लिस्टिंग होऊ शकणार नाही. 


पहिली अट : कंपनीला त्यांच्या संचालक मंडळात एका स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करावी लागेल.

दुसरी अट : कंपनीला त्यांचा लेखापरिक्षण अहवाल एनसई किंवा सेबीला द्यावा लागेल. 



सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडच्या आयपीओच्या लिस्टींगची तारीख 29 नोव्हेंबर 2024 होती.  सेबीच्या निर्देशानंतर लिस्टिंगवर स्थगिती देण्यात आली आहे. रिपोर्टुसार कंपनीनं सोमवारी त्यांच्या आर्थिक खात्यांच्या चौकशीसाठी लेखापरिक्षक नेमला आहे. त्याचा अहवाल दोन-तीन दिवसांमध्ये येऊ शकतो.  



या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम लावली होती. सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेड कंपनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादक कंपनी आहे. संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कंपनी काम करते. या कंपनीच्या आयपीओचा जीएमपी जवळपास 100 टक्के होता. त्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. आयपीओतील एका समभागाची किंमत 226 रुपये होती, जीएमपीनुसार 471 रुपयांपर्यंत गेला होता. जीएमपीनुसार गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला असता, मात्र सेबीच्या सूचनेनंतर जीएमपी 50 टक्क्यांनी घसरला आहे. आता जीएमपीएवर एका शेअरची रक्कम 326 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 


सेबीच्या निर्देशानंतर सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडनं आयपीओमध्ये गुंतवलेली रक्कम परत घेण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आयपीओमधून सबस्क्रिप्शनमधून माघार घ्यायची असल्यास गुंतवणूकदारांना 28 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत मुद आहे. सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडच्या आयपीओतून 99.07 कोटी रुपये उभारले जाणार होते. यामध्ये 43.84 लाख  नवे शेअर जारी केले जाणार होते. यासाठी प्रति शेअर रक्कम 214 ते226 रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीनं संस्थात्मक गुंतवणूकारांसाी 35 टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के कोटा निश्चित केला होता. 



C2C Advanced Systems Allotment Out: C2C Advanced Systems IPO GMP has surged on the allotment date after slipping marginally last week following the postponement of the company's listing due to regulatory concerns.


C2C Advanced Systems deferred its listing date to December 3 after a Sebi directive raised concerns over the auditing system of the company.


Those who subscribed to the maiden share sale by C2C Advanced Systems can check their allotment status on the official website of the registrar, Link Intime India Pvt Ltd, using their application number or PAN details.


The Rs 99-crore C2C Advanced Systems IPO allotment status can also be checked on the BSE and NSE websites.


C2C Advanced Systems' IPO is delayed by SEBI/NSE for compliance. Investors can withdraw bids by Nov 28, 3 PM. 


#C2CAdvancedSystems #SEBI #IPO #Investment #StockMarket #FinanceNews #PublicOffering #MarketUpdate #InvestorAlert #GMP #EquityMarket #InvestmentOpportunity #FinancialReport #CompanyNews #MarketTrends #InvestmentReturns #DefenseSector #SpaceTechnology #ShareMarket #TradingNews

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)