क्रिकेट सोडून त्याच्या इतर गोष्टी वाढल्या
‘Earned ₹30-40 Cr by Age 23’ Ex-DC Coach Shares How Money Corrupted Prithvi Shaw’s Mind
- पृथ्वी शॉला संघर्षात मदत करणारे प्रशिक्षक
- आगामी सचिन तेंडुलकर असा ओळखला जाणारा पृथ्वी शॉ
- Involved In Groups Outside Cricket
- Prithvi Shaw's involvement in 'groups outside cricket' breaks coach's heart
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने वयाच्या 23 व्या वर्षीय 30 ते 40 कोटी कमावल्याच्या दाव्यांदरम्यान त्याचे बालपणीचे प्रशिक्षक संतोष पिंगुटकर यांनी त्याची घसरण पाहून चिंता व्यक्त केली आहे. एकेकाळी आगामी सचिन तेंडुलकर असा उल्लेख केला जाणारा पृथ्वी शॉ सध्या सर्वात खडतर प्रवासाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेली 3 वर्षं दूर असणाऱ्या पृथ्वीला आता आयपीएलमध्येही कोणी खेळवण्यास तयार नाही.
दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर दोन दिवसांच्या लिलावात एकाही संघाने त्याला विकत घेतलं नाही. पृथ्वीचे माजी प्रशिक्षक सौरव गांगुली, रिकी पाँटिंग आणि राहुल द्रविड लिलावात उपस्थित होते. पण पृथ्वी शॉचं नाव आलं तेव्हा एकानेही रस दाखवला नाही. शॉच्या घसरणीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्याला मुंबईच्या रणजी संघातून आधीच वगळण्यात आलं होतं. सध्या चालू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याच्या 33, 0, 23 आणि 40 धावांनी त्यात आणखी भर टाकली आहे. अशा परिस्थितीत, शॉला त्यांच्या सुरुवातीच्या काळात मदत करणारे पिंगुटकर यांनी आगामी काळात स्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली आहे.
तो फक्त 25 वर्षांचा आहे. अजूनही त्याच्या हातात बराच मोठा काळ आहे. जर त्याला क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर त्याला पुनरागमन करावं लागेल, असं संतोष पिंगुटकर यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितलं. त्याच्या खेळाशिवाय इतर सर्व गोष्टींमध्ये वाढ झाली होती. तो क्रिकेटच्या बाहेर त्याच्या ग्रुप्समध्ये अधिक सामील होता. परंतु, त्याला क्रिकेट आवडते यात शंका नाही. तथापि, तो खेळावरील प्रेमाचे त्याच्या प्रयत्नांमध्ये रुपांतर करु शकला नाही. त्यामुळेच तो अशा दुबळ्या टप्प्याचा साक्षीदार आहे. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर त्याने पुनरागमन करावं. प्रत्येकाच्या शुभेच्छा आहेत, असं संतोष पिंगुटकर यांनी म्हटलं आहे.
Once dubbed the next big thing in Indian cricket, Prithvi Shaw’s downfall has rung alarm bells about how earning too much money and fame at a young age can corrupt people’s minds.
The 25-year-old, who earned comparisons with legend Sachin Tendulkar in his initial days, recently went unsold in the IPL 2025 mega auction, after no team showed any interest in acquiring his services.
#PrithviShaw #Cricket #IndianCricket #IPL #Sports #Comeback #Motivation #Inspiration #YouthAthlete #CricketCoach #Struggle #Resilience #Talent #FutureStar #CricketLife #SportsJourney #HardWork #Dedication #CricketCommunity #Hope