बेळगाव : धारकरी आक्रमक बनले... #शिवप्रतिष्ठान सरोज पाटील vs भिडे गुरुजी

0



बेळगाव : धारकरी आक्रमक बनले... #शिवप्रतिष्ठान  सरोज पाटील vs भिडे गुरुजी






  • शरद पवार यांच्या बहीण आणि माजी मंत्री एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील 
  • सरोज पाटील यांचे कोल्हापूरमधील कागलमध्ये जोरदार भाषण #विधानसभा #महाराष्ट्र 
  • तुमची मुलं संभाजी भिडेच्या नादाला लागली आहेत का बघा, आपल्या मुलांना गटार गंगेत जाऊ देऊ नका -  सरोज पाटील



बेळगाव-belgavkar : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सरोज एन. पाटील यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. सगळा जाती द्वेष पसरवला जात आहे. तुमची मुलं त्या संभाजी भिडेच्या नादाला लागली आहेत का बघा? त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका, असं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी केले होते. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या.



गुरुवारी बेळगावातील ज्योती महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या वादग्रस्त विधानाने संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकऱ्यांनी ज्योती महाविद्यालय परिसरात जाऊन निषेध नोंदविला. शिवाय काही धारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने व्याख्यान थांबवावे लागले. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवप्रतिष्ठानच्या भिडे गुरुजींबाबत सरोज पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. याचे पडसाद बेळगावातही उमटले आहेत. 


बेळगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवाय या वादग्रस्त विधानाबाबत सरोज पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील धारकऱ्यांनी केली. सोशल मीडियावर कार्यक्रमाला विरोध होणार हा संदेश आदल्या दिवशीच व्हायरल झाल्याने या कार्यक्रमाला मात्र सरोज पाटील आल्याचं नाहीत. 


तरीही ज्योती महाविद्यालयाच्या आवारात पोलीस दाखल झाले होते. व्याख्यानादरम्यान धारकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन धारकऱ्यांना शांत राहण्याची विनंती केली. 


पुरोगामी संस्थाकडून धर्माविरोधी विचारांनाच खतपाणी - किरण गावडे

याबाबत आपली प्रतिक्रिया देताना कर्नाटक प्रांतप्रमुख  किरण गावडे म्हणाले की, संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील यांनी भिडे गुरुजींच्या संदर्भात अत्यंत अनुदार उद्गार काढले आहेत. तसेच या पुरोगामी संस्था धर्माविरोधी विचारांनाच खतपाणी घालत आहेत. जे आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ.



#SarojPatil #Kolhapur #Maharashtra #NDPatil #ShivPratishthan #PoliticalSpeech #ControversialStatement #FarmersWorkersParty #ShivajiMaharaj #Belgaum #KiranGawde #ProgressiveThoughts #SocialMedia #Protest #CommunityResponse #ElectionCampaign #CasteDiscrimination #PublicReaction #YouthAwareness #PoliticalActivism


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)