बेळगाव : KSRTC संप पुकारण्याचा निर्णय @कर्नाटक
KSRTC workers call statewide strike on December 31 over unpaid dues, salary
Karnataka State Road Transport Corporation unions plan a statewide strike on News Year's Eve, citing Rs 1,750 crore arrears and delayed salary hikes. The protesting unions will also hold a protest on December 9 called "Belagavi Chalo".
- KSRTC staff plan to organise State-wide strike
- KSRTC workers demand unpaid dues and salary hike
- “Belgaum Chalo” protest set for December 9
- Statewide strike scheduled for December 31
बेळगाव-belgavkar : वेतनवाढ, थकबाकी जमा करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनावेळी केएसआरटीसीच्या चारही विभागातील कर्मचारी अआंदोलन करणार आहेत.
गेल्या जानेवारीपासून वेतनवाढ मिळणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण, डिसेंबर महिना आला तरी वेतनवाढ मिळाली नाही. २८ महिन्यांची थकबाकी सरकारकडून मंजूर झालेली नाही, यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा सरकारकडे मागणी करण्यात आली. पण, दरवेळी दर्लक्ष करण्यात आले. निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळालेली नाही. एकूण १७८७ कोटीची धकबाकी आहे. ५ हजार कोटी रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम मंजूर झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. सरकारला इशारा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या संयुक्त कृती समितीने बैठक घेतली.
केएमआरटीसीच्या स्टाफ आणि फेडरेशन्चे अध्यक्ष अनंत सुब्बाराव यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. याआधी एप्रिल 2019 मध्ये याच मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. सुमारे आठवडाभर संप सुरु होता. सरकारने संप पुकारलेल्या दिवसाचे वेतन मिळणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही कर्मचारी सेवेत दाखल झाले होते. काही मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. मार्च २०२३ आणि गेल्या फेब्रुवारीमध्ये संप पुकारण्यात आला होता.
The KSRTC Staff and Workers’ Federation, in collaboration with other transport unions, has announced a state-wide strike on December 31 to press the Karnataka government to address long-pending demands, including unpaid arrears and gratuity payments.
Union leaders claim that the government owes Rs 1,750 crores in arrears from a salary hike announced in 2020 and an additional Rs 399.29 crore in gratuity payments. Despite assurances that a new salary hike would be implemented in January 2024, no formal decision has been made, prompting the unions to escalate their protests.
#KSRTC #Karnataka #BelagaviChalo #StatewideStrike #TransportWorkers #SalaryHike #UnpaidDues #Protest #WorkersRights #GovernmentResponse #StrikeAction #TransportUnion #Belgaum #KarnatakaTransport #EmployeeDemands #Gratuity #LaborRights #PublicTransport #Solidarity #KarnatakaGovernment