ओझा सरांची राजकारणात एन्ट्री?
Popular UPSC teacher enters politics ahead of Delhi polls
- कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
- प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा
- फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक
प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. Prominent UPSC educator Avadh Ojha हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे (Aam Aadmi Party (AAP)).
UPSC coach Avadh Ojha ‘Sir’ joins AAP to reform Delhi's education sector
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील असलेले अवध ओझा हे युपीएससी शिक्षक आणि वक्ते आहेत. युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते ओझा सर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं पूर्ण नाव अवध प्रताप ओझा असे आहे.
अवध ओझा यांचं प्राथमिक शिक्षण गोंडामध्ये झाले. त्यांनी पदवीचे शिक्षण गोंडातील फातिमा इंटर कॉलेजमधून पूर्ण केले.
अवध ओझा यांना लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. अवध ओझा यांची आई पेशाने वकील होती, तर वडील पोस्टमास्तर होते. अवध ओझा यांचे आयएएस अधिकारी होण्याचे होते. त्यांनी प्रयागराजमध्ये यूपीएससीची तयारी केली. पण, यश मिळाले नाही. त्यानंतर नोकरी न करता वेगळा रस्ता निवडला आणि कोचिंग सुरू केले. २००५ मध्ये त्यांनी दिल्लीतील मुखर्जीनगरमध्ये पहिले कोचिंग सेंटर सुरू केले होते. शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांची कमाई वाढत गेली. वृत्तानुसार अवध ओझा यांच्याकडे ११ कोटी संपत्ती आहे.
अवध ओझांच्या नेटवर्थमध्ये सर्वाधिक हिस्सा कोचिंग सेंटर्समधून येणाऱ्या उत्पन्नाचा आहे. ओझा यांना कोचिंग व्यतिरिक्त यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उत्पन्न येते. ते मोटिवेशनल स्पीकर असून, एखाद्या सेलिब्रिटींसारखे प्रसिद्ध आहेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आज (२ डिसेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत केजरीवाल शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करणार असून, याच परिषदेत अवध ओझा यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली जाण्याची चर्चा आहे. दिल्लीमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे राजकारण तापू लागलं आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी, भाजप, काँग्रेस या सर्वच पक्षांनी निवडणुकीवर लक्ष केले आहे. दिल्लीची सत्ता कायम राखण्याचे आव्हान आम आदमी पार्टीसमोर आहे. त्यामुळे केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आपने आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही आपकडून करण्यात आली आहे.
Prominent UPSC educator Avadh Ojha joined Aam Aadmi Party (AAP) in New Delhi on Monday. Popularly known as Ojha Sir, he joined the party in the presence of AAP national convener Arvind Kejriwal and former Delhi Deputy CM Manish Sisodia.
#AvadhOjha #UPSC #AAP #DelhiElections #EducationReform #PoliticalEntry #MotivationalSpeaker #CoachingCenter #DelhiPolitics #ArvindKejriwal #IASPreparation #YouTubeChannel #CelebrityTeacher #Gonda #CoachingSuccess #ElectionAnnouncement #PoliticalCareer #StudentSuccess #DelhiAssemblyElections #EducationSector