Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी #RBI

0



Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी #RBI 




Banks report 50.4% increase in gold loan demand amid financial distress


  • Gold loans grow over 50% in seven months
  • देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया



Reserve Bank of India (abbreviated as RBI)  ने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही थक्क करणारी माहिती समोर आली आहे. भारतीयांच्या कर्ज घेण्याच्या पॅटर्नसंदर्भात RBI ने आकडेवारी जारी केली असून यामध्ये सोन्यासंदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे.



सोने गहाण ठेऊन त्याच्या मोबदल्यात कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. 2024-25 च्या आर्थिक वर्षातील यासंदर्भातील आकडेवारी फारच थक्क करणारी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात बँकांमध्ये सोने आणि घरातील दागदागिन्याच्या मोबदल्यात घेतल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण 50.4 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे.


 



भारतातील बँकांच्या क्षेत्रनिहाय कर्जवितरणाची आकडेवारी RBI ने जाहीर केली. यातूनच भारतामध्ये सोनं तारण ठेवणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसूं आलं आहे.


 

आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये दिसून आलं आहे. 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत सोन्यावरील कर्जाची थकबाकी 154282 कोटी रुपये इतकी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हीच थकबाकी 102562 कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच वार्षिक आधारे या थकबाकीचा विचार केला तर मागील सात महिन्यात झालेली वाढ ही 50.4 टक्के इतकी आहे.


 

सोने गहाण ठेऊन कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढण्यामागे दोन प्रमुख कारणं : सोनेतारण ठेऊन कर्ज घेण्याची प्रक्रिया ही सामान्य कर्जाच्या प्रक्रियेपेक्षा अधिक सुलभ असते तसेच त्यावरील व्याजही तुलनेत कमी असल्याने कर्जदार हा पर्याय निवडण्यास प्राधान्य देताना दिसतात. सोने गहाण ठेऊन कर्ज घेण्यामागील एक प्रमुख कारण हे कर्जाविषय सुरक्षेचे आहे. बिगर बँक वित्तीय संस्थांनी असुरक्षित कर्जापेक्षा सोन्यावरील सुरक्षित कर्जाचे धोरण लोकांकडून स्वीकारले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत बिगर बँक वित्तीय संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये 0.7 टक्क्यांची घट झाली आहे.




मागील काही आठवड्यांमध्ये सोन्याच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. यामुळे ग्राहकांना सोन्याच्या मोबदल्यात अधिक कर्ज सहजपणे मिळण्याचा पर्याय सोनेतारण ठेवण्याच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. त्यामुळेही सोनेतारण ठेऊन कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.



The Reserve Bank of India (RBI) has flagged serious issues in the disbursement of gold loans, urging lenders to reform repayment practices.


Gold loans by banks have grown by 50.4% in the first seven months of the financial year. This increase is due to a shift from NBFCs and a preference for secured loans. The total gold loans outstanding as of October 2024 stand at Rs 1,54,282 crore. Other personal loan segments saw single-digit growth.


According to the latest Reserve Bank data on sectoral deployment of credit, banks' loans against gold jewellery have grown by a whopping 50.4%



#GoldLoan #RBIData #FinancialDistress #GoldLoanDemand #IndiaBanking #LoanStatistics #GoldCollateral #RBIReports #EconomicTrends #GoldPrices #LoanGrowth #FinancialSecurity #NonBankingFinance #GoldAssets #LoanIncrease #BorrowingTrends #GoldMarket #InvestmentTrends #DebtManagement #FinancialAwareness
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)