पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? #PetrolPrice #DieselPrice #FuelTax #WindfallTax
Government scraps windfall tax on petrol, diesel, and aviation fuel exports
- केंद्र सरकारने घेतला निर्णय
- कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा निर्णय
Government scraps windfall tax on petrol, diesel, and aviation fuel exports : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ईंधनावर लागणारा विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कर टर्बाइन फ्युलपासून ते पेट्रोल-डीझेलवर लावण्यात येतो. यालाच विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्क (SAED) असंही म्हटलं जातं. हा कर हटवण्यात आल्यानंतर पेट्रोल-डीझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
अर्थ मंत्रालयाने हा कर पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये हा कर लावण्यात आला होता. यावेळेस रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान कच्चा तेलाची किंमतीने उच्चांकी गाठला होता. 1 जुलै 2022 रोजी केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्स लागू केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात डीझेल, पेट्रोल आणि एटीएफचे दर घरगुती बाजारापेक्षा जास्त असतील तर तेल कंपन्या निर्यात वाढवतात. जेणेकरुन अधिक नफा कमावता येईल. सरकारने यावर लगाम ठेवण्यासाठी आणि घरगुती बाजारात स्थिरता आणण्यासाठी विंडफॉल प्रॉफिट टॅक्स लावला होता. अन्य देशांच्या धर्तीवर भारतानेही देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार यांच्यावर विंडफॉल टॅक्स लावला होता.
माहितीनुसार, सरकारने कच्चा तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्याने Crude Oil, विमानाचे इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर 30 महिन्यांपूर्वी लावण्यात आलेला टॅक्स सोमवारी रद्द केला आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने 2022 मध्ये सरकारने क्रुड, पेट्रोल-डीझेल आणि विमानाच्या इंधनाच्या आयातीवरुन तेल कंपन्यांना होणाऱ्या नफ्यावर विंडफॉल टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा उद्देश महसूल वाढवणे इतका होता. आता सरकारकडून हा टॅक्स हटवण्यात आल्याने तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
The Government on Monday scrapped the windfall tax on Aviation Turbine Fuel (ATF), crude products, petrol and diesel products, after months of deliberations.
The move, effective immediately, is set to bring relief to oil conglomerates Reliance and ONGC, as their gross refining margins may get a lift.
The windfall tax is a special levy on domestic crude oil production, introduced in July 2022 after rising global crude prices, to capture revenue from windfall gains made by producers.
What is a windfall tax?