पॅकिंग वॉटरही 'हाय रिस्क फूड' श्रेणीत #FSSAI #PackagedWater #HighRiskFood #FoodSafety

0

 


पॅकिंग वॉटरही 'हाय रिस्क फूड' श्रेणीत #FSSAI #PackagedWater #HighRiskFood #FoodSafety





FSSAI declares bottled water high-risk


FSSAI reclassifies packaged drinking water as high-risk, mandates stricter checks


Food safety regulator declares bottled water high-risk: What does that mean? : भारताच्या अन्न नियामक संस्थेने (FSSAI) पॅकेज केलेले कोणतेही पेयजल किंवा मिनरल वॉटर आता 'उच्च जोखीम अन्न' या श्रेणीमध्ये समावेश केले आहे. Food Safety and Standards Authority of India (FSSAI) च्या या नव्या नियमामुळे पॅकिंगमधील कोणतेही पाणी उत्पादन वार्षिक तपासणी आणि ऑडिटच्या अधीन असणार आहे. 



FSSAI classifies packaged drinking water as 'High-Risk Food Category'


FSSAI अधिसूचनेनुसार, पॅकिंग केलेले पाणी किंवा खनिज पाणी ही उत्पादने आता तपासणी आणि ऑडिटच्या अधीन असतील. या उत्पादनांसाठी Bureau of Indian Standards (BIS) प्रमाणपत्राची गरज नसल्याच्या सरकारच्या ऑक्टोबरमधील निर्णयानंतर प्राधिकरणाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. इथून पुढे पेयजल पॅकिंग सारख्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या व्यवसायिकांना हा मोठा त्रास ठरणार आहे. त्यांना त्यांच्या ड्रिंकिंग वॉटर पॅकेज्ड व्यवसायाचे FSSAI-मान्यताप्राप्त Third  Party अन्न सुरक्षा एजन्सीद्वारे वार्षिक ऑडिट करणे आवश्यक आहे.


The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has decided to classify packaged drinking and mineral water as a 'High-Risk Food Category.' This means that these products will now be subject to mandatory inspections and third-party audits.


पॅकिंगमधील पिण्याचे पाणी आणि मिनरल वॉटरला "हाय-रिस्क फूड" म्हणून लेबल लावले याचा याचा अर्थ ही उत्पादने असुरक्षित आहेत, असा होत नाही. त्याऐवजी ही उत्‍पादने अधिक सुरक्षा पूर्वक तपासून मगच पॅकिंग केले जातील. ग्राहकांसाठी उत्पादक आणि व्यवसायांना आता नियमित तपासणी आणि वार्षिक ऑडिट करावे लागतील.


यापूर्वी उद्योजकांनी पाणी पॅकिंग व्यवसायाच्या BIS आणि FSSAI या दोन्ही प्राधिकरणाची प्रमाणपत्रके आवश्यकता काढून टाकण्याची मागणी केली होती. या दुहेरी प्रमाणन प्रक्रियेमुळे व्यवसायांना वाढीव खर्च, प्रशासकीय भार आणि प्रक्रियात्मक विलंब यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत होता. परंतु FSSAI च्या नवीन अधिनियमानुसार आता पाणी विक्री उत्पादकांना वार्षिक तपासणी आणि ऑडिट करणे बंधनकारक असणार आहे.




The change follows the government’s October decision to remove the requirement for certification from the Bureau of Indian Standards (BIS) for these products.



#FSSAI #PackagedWater #HighRiskFood #FoodSafety #MineralWater #WaterQuality #BottledWater #FoodRegulation #SafetyStandards #AnnualAudit #Inspection #IndianStandards #ConsumerSafety #WaterPackaging #FoodAuthority #HealthRegulations #QualityControl #SafeDrinkingWater #FoodIndustry #WaterSafety

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)