गरीबांची डाळ ‘भारत डाळ’ | #BharatDal

0




गरीबांची डाळ ‘भारत डाळ’ | BharatDal



What is Bharat Dal by central government?






  • ‘भारत डाळ’ नेमकी आहे काय?
  • चणा, मूग आणि मसूर डाळ 20-25% सवलतीने e-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन खरेदी करा 
  • मोबाइल व्हॅन्सद्वारेही डाळींचे वितरण
  • sale of chana dal under the brand name 'Bharat Dal' at subsidised rates



Introducing ‘Bharat Dal’: Your Affordable and Nutritious Pulse Solution!



केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात सवलतीच्या दरात चणा डाळ (Dal) उपलब्ध करुन दिली आहे. सध्या या चणा डाळीची विक्री सुरु केली आहे. भारत सरकारनं 'भारत डाळ' या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरु केलीय. महागाई प्रचंड वाढत आहे. त्यामुळे डाळींच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने भारत ब्रँडच्या अंतर्गत देशभरात 20 ते 25 टक्क्यांपर्यंत डाळ अत्यंत स्वस्तात उपलब्ध करून दिली आहे. 



ग्राहकांना किफायतशीर किमतीत डाळ उपलब्ध करून देण्यासाठी, सरकार किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत चणा, तूर, उडीद, मूग आणि मसूर या पाच प्रमुख डाळींचा राखीव साठा ठेवते. किमती नियंत्रित करण्यासाठी राखीव साठा टप्प्याटप्प्याने आणि निश्चित स्वरूपात बाजारात उतरवला जातो.



कुठून डाळ खरेदी करायची? : डाळ कमी किमतीत खरेदी करता येईल. या डाळी कोऑपरेटिव्ह रिटेल नेटवर्क आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध होणार आहेत. साबुत चणा 58 रुपये प्रति किलोग्रॅम, चना डाळ 70 रुपये प्रति किलोग्रॅम, मूग डाळ 107 रुपये प्रति किलोग्रॅम, साबुत मूग डाळ 93 रुपये प्रति किलोग्रॅम आणि मसूर डाळ 89 रुपये प्रति किलोग्रॅम या किमतीत मिळू शकते.




‘भारत डाळ’ कार्यक्रमांतर्गत मोबाइल व्हॅनद्वारे डाळींची विक्री केली जाईल. हा उपक्रम उपभोक्त्यांना स्वस्त किमतीत आवश्यक खाद्यपदार्थांची उपलब्धता करून देत आहे. 




राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता संघ (एनसीसीएफ - National Cooperative Consumers'​ Federation Of India Limited (NCCF)), राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ (नाफेड - National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.(NAFED)) आणि केंद्रीय भंडार यांसारख्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली जाईल. 



The government, in its efforts to control food prices for consumers, initiated the sale of chana dal under the brand name 'Bharat Dal' at subsidised rates. Priced at Rs 60 per kg for a 1 kg pack and Rs 55 per kg for a 30 kg pack, Bharat Dal has quickly emerged as the highest-selling brand in the country.



The central government as part of it efforts to check food prices at the retail level had started sale of chana dal under the brand name 'Bharat Dal' at subsidized rates.


#BharatDal #AffordableNutrition #PulseSolution #ChanaDal #MoongDal #MasoorDal #Ecommerce #FoodSecurity #GovernmentInitiative #SubsidizedRates #HealthyEating #ConsumerSupport #FoodPrices #MobileVans #CooperativeSociety #NutritionForAll #FoodDistribution #India #HealthyLifestyle #BudgetFriendly

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)