चेन पुलिंग महागात पडणार, दर मिनिटाला एवढा दंड ₹₹₹₹ #ChainPulling #RailwayRules #HeavyFines

0

 



चेन पुलिंग महागात पडणार; दर मिनिटाला एवढा दंड ₹₹₹₹ #ChainPulling #RailwayRules #HeavyFines




Unauthorised chain pulling can now cost you dear



Heavy Fines for Unauthorised Train Alarm Chain Pulling





ट्रेनमधून प्रवास करताना विनाकारण ट्रेनची साखळी ओढली (चेन पुलिंग) तरी महागात पडणार आहे. Chain Pulling झाल्यास ₹ 500 रुपयांच्या दंडाशिवाय आपल्याला डिटेन्शन चार्जेस देखील भरावे लागणार आहेत. डिटेन्शन चार्ज दर मिनिटाला ₹ 8000 रुपये एवढा असेल. याशिवाय ₹ 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. 




अशा प्रकारे ट्रेन 5 मिनिटे थांबली तर चेन ओढणाऱ्याला ₹ 40000 रुपये डिटेन्शन (₹ 8000 प्रत्येक मिनिटाला * 5 मिनिट) चार्ज आणि ₹ 500 ​​रुपये दंड भरावा लागेल.





माहितीनुसार, एकदा चेन पुलिंगनंतर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी जवळपास 5-7 मिनिटे लागतात. या काळात रेल्वेला मोठे नुकसान सोसावे लागते. यासाठी आतापर्यंत केवळ 500 रुपये एवढ्याच दंडाची तरतूद होती. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. भोपाळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक देवाशिष त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या भोपाळ विभागात 6 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. 





गेल्या 3 महिन्यांत भोपाळ रेल्वे विभागात चेन पुलिंगच्या 1262 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे अँक्टच्या कलम 141 नुसार, या प्रकरणात एकूण 2 लाख 90 हजार 775 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. माहितीनुसार, चेन पुलिंगनंतर अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरुन पळू लागतात. 




नव्या व्यवस्थेनुसार, अशा लोकांनाही चेन पुलिंगसाठी दोषी मानले जाईल. पकडले गेल्यानंतर, त्यांच्यावरही स्वतंत्रपणे दंडत्मक कारवाई केली जाईल. यामुळे, चेन पुलिंग दरम्यान कुठल्याही निर्दोष प्रवाशाने ट्रेनमध्ये चढण्याचा अथवा ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू नये. असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.


unauthorised alarm chain pulling causes significant delays and financial losses : 

Illegal alarm chain pulling will attract a fine plus the cost of stopping the train. Unauthorised alarm chain activation now incurs a Rs 500 fine plus detention charges of Rs 8,000 per minute. For instance, if the train stopped for 5 minutes, the fine would be Rs 500 + Rs 8,000 x 5 = Rs 40,000, total Rs 40,500.



The Bhopal division permits alarm chain usage exclusively in two situations:

1. If the life of the passenger is in danger – like to avoid an accident in case of a fall.

2. Children below 10 years of age or persons above 60 years of age missing – if they could not board and the train started moving. Any other usage is considered unlawful.



Other rules and warnings:

1. Passengers attempting to flee after chain pulling will face severe penalties.

2. The railway authorities are conducting continuous awareness through announcements, posters, and campaigns.


#TrainSafety #ChainPulling #RailwayRules #HeavyFines #UnauthorizedPulling #TrainDelays #BhopalRailway #PassengerAwareness #RailwaySafety #FineForPulling #DetentionCharges #TrainTravel #IndianRailways #SafetyFirst #TravelSmart #RailwayManagement #PublicTransport #TrainRegulations #PassengerRights #RailwayAwareness


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)